घरमनोरंजनबिहारमधील पुरग्रस्तांच्या मदतीला अक्षय आला धावून!

बिहारमधील पुरग्रस्तांच्या मदतीला अक्षय आला धावून!

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार एक गुणी अभिनेत्याबरोबरच संवेदनशील अभिनेता असल्याचे त्याने वेळोवेळी सिध्द केलं आहे. लोकांच्या अडचणीच्या काळात अक्षय नेहमी त्यांच्या मदतीला धावून येतो. म ती पुरस्थिती असो वा दुष्काळ अक्षय आपला मदतीचा हात नेहमीच पुढे करतो. सध्या बिहारमध्ये आलेल्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षयने पुढाकार घेतला आहे.

बिहारमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं, मालमत्तेच मोठ्याप्रमाणावर नुकसानही झालं. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार १ कोटी रूपये मदतनीधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रीया देताना अक्षय म्हणाला, आम्ही या ठिकाणी जाऊन ज्या लोकांना गरज आहे अश्या लोकांचा शोध घेणार आहोत. बिहारमध्ये जे वाईट परिस्थीताचा सामना करत असतील, ज्यांनी आपलं घरदार सगळं गमावलं आहे अशा २५ कुटूंबांना अक्षय प्रत्येकी ४ लाखांची मदत करणार आहे. छट पुजेच्या दिवशी अक्षय हा चेक त्यांच्याकडे सुपूर्त करेल.

- Advertisement -

नैसर्गिक आपत्तीसमोर आपण काहीच करू शकत नाही. पण त्यानंतर आपल्याला जे शक्य आहे ते आपण करायला हवं. मी खूप नशीबवान आहे की ही संधी मला मिळत आहे. त्यामुळे या पुरात आपलं सर्वस्व गमवलेल्या कुटूंबांना मी मदत करणार आहे. आम्ही काही कुटूंबाची निवडही केली आहे. पटणामधील राकृष्ण कॉलनीमध्ये राहणारे दोन कुटूंब अशी आहेत जी मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात, दिवसाला ५००ते ६०० रूपये कमवतात. त्याचबरोबर एक ग्रोसरी दुकानदार आहे ज्याच्या कुटूंबात ५व्यक्ती आहेत. त्याचबरोबर एक १२ जाणांचे कुटूंब आहे जे हसनापूर येथे राहते. त्यांची पिठाची गिरणी होती. मात्र आलेल्या पुरामुळे त्यांचे मशीन बंद पडले. अशा कुटूंबांना आता खरी मदतीची गरज आहे. असं अक्षय कुमार प्रतिक्रीया देताना म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -