घरमनोरंजनNet Worth : किती श्रीमंत आहे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा?

Net Worth : किती श्रीमंत आहे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा?

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेनं गुरुवारी म्हणजे 18 एप्रिल रोजी राज कुंद्राची 97 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर आता शिल्पाकडे एकूण किती संपत्ती आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती : 

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty). शिल्पाचं व्यावसायिक तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिली आहे. शिल्पाने बाजीगर चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती 18 मिलियन आहे. एकूण संपत्ती 18 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच 134 कोटी आहे. त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे ब्रँड एंडोर्समेंट, चित्रपट आणि टीव्ही शो. शिल्पा जुहूमध्ये एका आलिशान घरात राहते. त्यांच्याकडे 24 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. शिल्पाची दुबई आणि लंडनमध्येही घरे आहेत.

- Advertisement -

मुंबईतील लोकप्रिय रेस्टॉरंट Bastian हे शिल्पा शेट्टीचे आहे. 2019 मध्ये तिने या हॉटेल चेनची 50 टक्क्यांची भागीदारी खरेदी केली होती. त्याव्यतिरिक्त तिचा एक फॅशन ब्रँडदेखील आहे. फिटनेस अॅपच्या माध्यमातूनही तिला नफा मिळतो. शिल्पाकडे अनेक लक्झरी कार आहेत ज्यात BMW i8, Lamborghini इत्यादी ब्रँडचा समावेश आहे . शिल्पा शेट्टी ब्रँड एंडोर्समेंटसाठी एक कोटी रुपये घेते. अभिनयासोबतच शिल्पा फिल्म प्रोड्युसर, स्टेज परफॉर्मर देखील आहे. तिने अनेक रिअल इस्टेट मालमत्तांमध्येही गुंतवणूक केली आहे.

राज कुंद्रा संपत्ती :

राज कुंद्रा याची संपत्ती 3 हजार कोटी इतकी आहे. राज कुंद्रा याचे नाव ब्रिटिश आशियाई उद्योगपतींच्या यादीत आहे. तो ग्रुपको डेव्हलपर्स, टीएमटी ग्लोबल, विवान इंडस्ट्रीज, जेएल स्ट्रीम प्रायव्हेट लिमिटेडसारख्या अन्य कंपन्यांचा मालक आहे.

- Advertisement -

____________________________________________________________________

हेही वाचा : Shilpa Shetty : राज कुंद्राची 97 कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -