घरक्राइमShilpa Shetty : राज कुंद्राची 97 कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

Shilpa Shetty : राज कुंद्राची 97 कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

Subscribe

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने त्याच्याविरोधात कारवाई केली आहे. याअंतर्गत ईडीने गुरुवारी राज कुंद्रा याची तब्बल 97 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने त्याच्याविरोधात कारवाई केली आहे. याअंतर्गत ईडीने गुरुवारी राज कुंद्रा याची तब्बल 97 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. बिटकॉइन घोटाळ्याशी संबंधित ही कारवाई करण्यात आली आहे. मनी लॉन्डरिंग कायदा, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईनंतर आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Shilpa Shetty husband raj kundra property worth rs 97 crore seized ed takes action advocate Prashant Dalvi relese statement)

केंद्रीय तपास यंत्रणा ईडीचे म्हणणे आहे की, राज कुंद्रा यांच्याकडे अजूनही 285 बिटकॉइन आहेत, ज्याची आजघडीला किंमत 150 कोटींहून अधिक आहे. दरम्यान, 2021 मध्ये झालेल्या पोर्नोग्राफी प्रकरणातही कुंद्राचा सहभाग होता. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मंजूर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने जी संपत्ती जप्त केली आहे, त्यात शिल्पा शेट्टी हिचा जुहू येथील बंगला आहे. याशिवाय पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेअर्स देखील आहेत. विशेष म्हणजे, शिल्पा शेट्टी यापूर्वी इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL मधील राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये भागीदार होती.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Crime News : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने 80 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा

कारवाई कोणत्या प्रकरणात?

बिटकॉइन पॉंजी स्कॅममध्ये ईडीने कुंद्रा विरोधात ही कारवाई केली आहे. ईडीने महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी वन व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि दिवंगत आरोपी अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज सह अन्य लोकांविरोधात तक्रार नोंदवली होती. याच्या आधारेच ईडीने त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली होती. या आरोपींनी बिटकॉईन्सच्या रूपात लोकांकडून मोठ्या प्रमाणात फंड गोळा केला आणि बिटकॉइनच्याच स्वरूपात दार महिना 10 टक्के परत करण्याचे आश्वासन दिले होते. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राला युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी गेनबिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याचा मास्टरमाईंड आणि प्रमोटर अमित भारद्वाजकडून 285 बिटकॉइन्स मिळाले होते, असे ईडीच्या तपासात समोर आले होते. (Shilpa Shetty husband raj kundra property worth rs 97 crore seized ed takes action advocate Prashant Dalvi relese statement)

- Advertisement -

वकिलांचे म्हणणे काय?

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांचे वकील प्रशांत पाटील यांनी एक निवेदन जारी केले आहे. “शिल्पा आणि राज पूर्णपणे निर्दोष आहेत. तसेच तपासात त्यांचे संपूर्ण सहकार्य असेल, असे या निवेदनात म्हटले आहे. आम्ही कायद्याचे पूर्णपणे पालन करू, तसेच मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलू”, असे वकील प्रशांत पाटील म्हणाले. (Shilpa Shetty husband raj kundra property worth rs 97 crore seized ed takes action advocate Prashant Dalvi relese statement)

हेही वाचा – Mumbai Crime News : गुंतवणुकीच्या नावाने दीड कोटींची फसवणूक; हॉटेल व्यावसयिकाविरुद्ध गुन्हा दाखल


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -