घरताज्या घडामोडीGangubai Kathiawadi नंतर आलिया भट्टने वाढवलं मानधन ?

Gangubai Kathiawadi नंतर आलिया भट्टने वाढवलं मानधन ?

Subscribe

गंगूबाई काठियावाडी सिनेमा बॉक्स ऑफिसवर जरी बरी कमाई करत असला तरी आलियाच्या करिअरला या सिनेमाने चार चाँद लावले आहेत. आलिया भट्ट सध्या तिच्या करिअरच्या पिक पॉईंटला येऊन ठेपली आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या एकाच अभिनेत्रीची चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट. गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई करताना दिसतोय. आलियाच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीतील हा तिचा वेगळा सिनेमा ठरला आहे. गंगूबाई काठियावाडी सिनेमातील आलियाचा अभिनय चांगलाच भाव खाऊन गेला आहे. आलियाने तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना मनावर पुन्हा एकदा राज्य केले आहे.

गंगूबाई काठियावाडी सिनेमा बॉक्स ऑफिसवर जरी बरी कमाई करत असला तरी आलियाच्या करिअरला या सिनेमाने चार चाँद लावले आहेत. आलिया भट्ट सध्या तिच्या करिअरच्या पिक पॉईंटला येऊन ठेपली आहे. अशातच मीडिया रिपोर्टनुसार, गंगूबाई काठियावाडी या सिनेमासाठी दिगदर्शक संजय लिला भन्साळी यांनी आलियासाठी मोठी रक्कम मोजली होती. सिनेमासाठी आलियाने २० करोड रुपये मानधन घेतल्याच्या चर्चा आहेत.

- Advertisement -

गंगूबाईच्या यशानंतर आलियाने तिचे मानधन वाढवणार का असा सवाल केला असता त्यावर ट्रेंड एक्सपर्ट अक्षय राठीने म्हटलेय, आलियाने गंगूबाई सिनेमासाठी २० करोड रुपये मानधन घेतले अशा चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहेत मात्र याविषयीची खात्रीशीर माहिती माझ्याकडे नाही. परंतु मला असे वाटते की कलाकारांनी एका मर्यादेनंतर जास्त मानधन आकारण्यापेक्षा पार्टनर बनून नफा कसा मिळवता येईल याकडे पाहिले पाहिजे.

अक्षय राठीने पुढे असे म्हटले आहे की, प्रत्येक ब्लॉकबस्टर सिनेमानंतर कलाकार आपले मानधन वाढवतात हा आपल्या सिनेसृष्टीचा नियम आहे. परंतु प्रत्येक फ्लॉप नंतर त्यांना कोणी डिस्काउंट देत नाही. आपल्याकडे कलाकारांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्य म्हणावे लागेल की त्यांना इतके मानधन दिले जाते जे सिनेमाच्या आर्थिक व्यवहारांसाठी नुकसानदायक ठरू शकते.

- Advertisement -

हेही वाचा –  ITA Awards 2022 : रेड कार्पेटवर बॉलिवूडसह टेलिव्हिजन कलाकारांचा जलवा, पाहा फोटो

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -