घरक्रीडावेगवान गोलंदाज व्हायचे होते पण झाला स्पिनर, ३ सामन्यात या खेळाडूनं घेतले...

वेगवान गोलंदाज व्हायचे होते पण झाला स्पिनर, ३ सामन्यात या खेळाडूनं घेतले २१ विकेट

Subscribe

महाराष्ट्र क्रिकेट टीमचे सध्याच्या रणजी ट्रॉफी मधील प्रदर्शन काही खास राहिले नाही. भारतीय संघ आता पुढील सामन्यांच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तीन सामन्यात संघाने एक जिंकली आहे. तर दुसर सामना पराभूत आणि तिसरा सामना ड्रॉ झाला आहे. टीम ग्रूप बी मध्ये कायम राहिली आहे. संघाचे प्रदर्शन काही खास राहिले नाही परंतु संघातील गोलंदाजांनी सर्वांचे लक्ष वेधलं आहे. गोलंदाज सत्यजीत बच्चाव डावखुरा स्पिनर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये २१ विकेट घेतले आहेत. उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये या खेळाडूनं पहिल्या डावात सात विकेट घेतले आणि दुसऱ्या डावात एक विकेट घेतला होता. सत्यजीत अनेक वर्षांपूसन महाराष्ट्र टीमचा भाग आहे. तो तीन प्रकारातील महत्त्वाचा खेळाडू आहे.

सत्यजीत बच्चावचा आतापर्यंतचा प्रवास काही सोपा राहिला नाही. त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्याने २०१२ मध्ये तामिळनाडूविरुद्ध पहिला सामना खेळलो होता तेव्हापासून आतापर्यंत तो महाराष्ट्रासाठी आपलं योगदान देत आहे. आपल्या फिरकीने गोलंदाजाने अनेक फलंदाजांची विकेट घेतली आहे. आतापर्यंत सत्यजीतने २६ प्रथम श्रेणीतील सामन्यात ९९ विकेट घेतले आहेत. लिस्ट ए मध्ये हा आकडा २८ सामन्यात ५१ विकेट्सवर आहे. तर टी-२० मध्ये ३९ सामने खेळले असून ४८ गडी बाद केले आहेत. परंतु आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये सत्यजीतला स्पिनर बनायचे नव्हते. तसेच त्याच्या क्रिकेटर होण्यामागे २००३ विश्व चषकाचे मोठं योगदान आहे.

- Advertisement -

वेगवान गोलंदाज म्हणून केली होती सुरुवात

सत्यजीतने सुरुवात वेगवान गोलंदाजीने केली होती. सुरुवातीला त्याला वेगवान गोलंदाज व्हायचे होते. त्याला कधी वाटले नव्हते की तो एक उत्तम स्पिनर होईल. एका मुलाखतीमध्ये सत्यजीत म्हणाला होता की, २००३ मध्ये ठरवलं की, क्रिकेर व्हायचे यानंतर माझ्या वडिलांनी मला नाशिकमधील एका अकॅडमीत भरती केले. जहीर खान माझा आदर्श होता त्यामुळे त्याच्यासारखीच नक्कल करण्याचा प्रयत्न करत होतो. कॅम्पमध्ये सुद्धा वेगवान गोलंदाजी करत होतो एका सामन्यात टेनिस बॉलने गोलंदाजी केली तेव्हा फार चांगले प्रदर्शन करता आले नाही. यामुळे डाव्या हाताने स्पिन चेंडू फेकला तेव्हा माझ्या प्रशिक्षकांनी सांगितले की, फिरकी गोलंदाजी करत जा.

सत्यजीतच्या प्रशिक्षकांनी त्याला अंडर-१६ स्तरावर खेळवण्याबाबत विचार केला. यामध्ये त्याने ५३ गडी बाद केले होते. पंरतु आपल्या वयापेक्षा जास्त वयोमर्यादेत खेळत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला होता. यामुळे त्याची निवड झाली नाही. सत्यजीत निराश झाला होता. परंतु त्याने पराभव न स्वीकारता प्रयत्न केले आणि पुढच्या सीझनमध्ये दमदार आगमन केले. त्याने अंडर-१९ स्तरावर ४८ विकेट काढले आणि महाराष्ट्राच्या अंडर १९ संघात धडक दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Ranji Trophy 2022 : मुंबई नॉकआऊटमध्ये तरी कर्णधार पृथ्वी शॉ नाखूश, फलंदाजीने केलं निराश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -