घरमनोरंजनजॅकलीनचं Topless फोटोशूट; एका शब्दातच केली स्वतःची स्तुती, म्हणाली...

जॅकलीनचं Topless फोटोशूट; एका शब्दातच केली स्वतःची स्तुती, म्हणाली…

Subscribe

बॉलिवूड विश्वातील हॉट अभिनेत्री म्हणून जॅकलीन फर्नांडिस नेहमीच सोशल मीडियावर तिच्या अदांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी जॅकलीन तिच्या चाहत्यांना तिचे नवे अपडेट शेअर करत असते. मात्र यावेळी आपल्या फोटोंनी अभिनेत्री जॅकलीनने तिच्या चाहत्यांना अवाक् केले आहेत. जॅकलीनने सोशल मीडियावर नुकतेच तिचे हॉट आणि टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. जॅकलीनने इन्स्टाग्रामवर तिचं नवं फोटोशूट शेअर तर केलं मात्र या हॉट आणि टॉपलेस फोटोशूटचं तिने स्वतः कौतुक केलं आहे. यावेळी स्वतःच्याच फोटोची स्तुती तिने एका शब्दात केल्याचे दिसते. हा फोटो शेअर करताना तिने Vava… असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर नेटकरी घायाळ असून तिच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव होताना दिसतोय. यासह हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

- Advertisement -

या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये जॅकलीन फर्नांडिस एका सोफ्यावर टॉपलेस होऊन रिलॅक्स पडल्याची दिसतेय. या फोटोमध्ये जॅकलीन खूपच हॉट दिसतेय. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या टॉपलेस फोटोला चाहत्यांसह नेटकऱ्यांची पसंती मिळत असून या फोटोची सध्या चर्चा होताना दिसतेय. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये जॅकलीनने स्मोकी आईज मेकअप केल्याचे दिसतेय. हा फोटो शेअर करताना जॅकलीनने स्वतःचीच तारीफ केली असून वावा…अशा कॅप्शनसह लव्ह इमोजी देखील पोस्ट केली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून जॅकलीन तिच्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाची शुटींग जैसलमेरमध्ये होती. नुकतीच ती या चित्रपटाची शुटींग संपवून मुंबईत परतली आहे. याशिवाय जॅकलीनचा सलमान खान स्टारर किक २, हॉरर कॉमेडी भूत पोलिस या चित्रपटासह सर्कस या चित्रपटात देखील ती प्रेक्षकांना लवकरच दिसणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -