घरताज्या घडामोडीकॉमेडियन महमूद अली यांची बहिण बॉलिवूड अभिनेत्री मीनू मुमताज यांचे कॅनडामध्ये निधन

कॉमेडियन महमूद अली यांची बहिण बॉलिवूड अभिनेत्री मीनू मुमताज यांचे कॅनडामध्ये निधन

Subscribe

मीनू मुमताज यांच्या करिअरची सुरुवात एक स्टेज आर्टिस्ट म्हणून झाली

बॉलिवूडमध्ये पन्नासच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, डान्सर आणि कॉमेडियन महमूद अली यांची बहिण अभिनेत्री मीनू मुमताज यांचे कॅनडामध्ये निधन झाले (Bollywood actress minoo mumtaz passed away in canada)  गेली अनेक वर्ष त्या कॅनडामध्ये वास्तव्याला होत्या. कॅनडामध्येच त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. मीनू मुमताज यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मीनू मुमताज यांच्या निधनाची वार्ता त्यांचे भाऊ अवनर अली यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानंतर बॉलिवूडच्या अनेक ज्येष्ठ तसेच नवोदित कलाकारांनी मीनू मुमताज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

मीनू यांनी १९६३ मध्ये डिरेक्टर एस अली अकबर यांच्याशी विवाह केला. तेव्हा त्या कॅनडामध्ये शिफ्ट झाल्या. मीनू मुमताज यांच्या पश्चात त्यांच्या ३ मुली आणि परिवार आहे.

- Advertisement -

मीनू मुमताज या प्रसिद्ध अभिनेत्री मीन कुमारी यांच्या फार जवळच्या व्यक्ती होत्या. मीनू मुमताज या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत उत्तम डान्सर आणि कॅरेक्टर आर्टिस्ट होत्या. मीनू मुमताज यांचे खरे नाव ‘मालिकाउन्निसा अली’ असे होते. मात्र त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर नाव बदलले. खरंतर अभिनेत्री मीन कुमारी यांनी मालिकाउन्निसा अली यांना मीनू मुमताज हे नाव दिले होते. तेव्हापासून त्या पुढील सर्व सिनेमांमध्ये मीनू मुमताज याच नावाने ओळखल्या गेल्या. १९५० -१९६० च्या दशकातील त्या अनेक हिंदी सिनेमात त्यांनी नायिका तसेच डान्सर म्हणून केले होते.

मीनू मुमताज यांच्या करिअरची सुरुवात एक स्टेज आर्टिस्ट म्हणून झाली. ‘सखी हातिम’ या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमात अभिनेता बलराज सहानी त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. मीनू मुमताज यांनी अनेक नामवंत निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. ‘चौदावी का चाँद’, ‘कागज के फूल’, ‘साहिब बीवी और गुलाम’, ‘ताजमहल’, ‘घूंघट’, ‘इंसान जाग उठा’, ‘घर बसाके देखो’, यासारख्या अनेक सिनेमात मीनू मुमताज यांनी काम केले आहे.


हेही वाचा – मकरंद देशपांडेने शेअर केला शाहरुखचा Unseen Pic, फोटो काढणाऱ्याला म्हणाला Sorry

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -