घरमनोरंजनबिग बॉसच्या घरात रंगणार कॅप्टन्सीचा टास्क

बिग बॉसच्या घरात रंगणार कॅप्टन्सीचा टास्क

Subscribe

मराठी बिग बॉसच्या घरात नवव्या आठवड्यामध्ये कोणाला कॅप्टन्सीचे पद मिळणार हे आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. काल बिग बॉसने दिलेल्या डाबर रेड पेस्ट प्रस्तुत ‘हेल्थी स्माईल’ या टास्कमध्ये मेघा, पुष्कर आणि आस्ताद विजयी ठरले होते. या तिघांमध्ये आज कॅप्टन्सीचा टास्क रंगणार आहे.

झेंडा रोवून वर्चस्व सिद्ध करणार 

कॅप्टन्सीसाठी बिग बॉस ‘ध्वज विजयाचा उंच धरा रे’ हे कार्य सदस्यांवर सोपवणार आहेत. या कार्यात विजयाचा झेंडा रोवणारा सदस्य कॅप्टन्सी पदाचा मानकरी ठरणार आहे. पूर्वीच्या काळी प्रतिस्पर्धी राज्यावर सत्ता प्रस्थापित केल्यावर तिथे झेंडा फडकविण्याची प्रथा होती. थोडक्यात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करून त्याच्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झेंड्याचा प्रतीकात्मक वापर होत असे. कॅप्टन्सीच्या कार्यात या झेंड्याची महत्वाची भूमिका असेल. त्यामुळे या तिघांमध्ये घरावर आपलं वर्चस्व कोण सिध्द करणार हे बघणं महत्त्वाच ठरणार आहे.

- Advertisement -
Big Boss Marathi
असा रंगला कॅप्टन्सीचा टास्क

बिग बॉसचा टास्क शांततेत पार पडला

मराठी बिग बॉसच्या घरामध्ये कोणताही टास्क दिल्यात तो शांततेत पार पडणे हा दुर्मिळ योग आहे. या सीजनच्या सुरुवातीपासूनच घरामध्ये दोन टीम पडल्यामुळे त्यांच्याच चुरशीची लढत टास्कदरम्यान पाहायला मिळाली आहे. टास्क जिंकण्यासाठी कधी कधी भांडण, झटापटी तर हिंसा झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र कालचा टास्क यामध्ये अपवाद ठरला आहे. घरातील सदस्यांसाठी काल दिलेला ‘हेल्थी स्माईल’ शांततेत केला आहे. या टास्कमध्ये तीन टीमची विभागणी करण्यात आली होती. टीम A  दात, टीम B डाबर रेड पेस्ट आणि टीम C कॅव्हिटी. टीम A ला म्हणजेच दातांना टीम C मधील सदस्यांपासून म्हणजेच कॅव्हिटीपासून वाचविण्याची जबाबदारी टीम B ची होती. या टास्कमध्ये टीम B विजयी ठरली.

Big Boss Marathi
असा रंगला कॅप्टन्सीचा टास्क

दोन्ही टीम ठरवणार आपापली स्ट्रॅटजी

कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये कोणाला घराचा कॅप्टन बनवायचा यावरून आस्ताद, रेशम, स्मितामध्ये बरीच चर्चा होणार आहे. तर मेघाच्या टीममध्ये कोणाला सपोर्ट करायचा यावर गॉसिप रंगणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -