घरमनोरंजनरणबीर कपूरविरोधात तक्रार दाखल

रणबीर कपूरविरोधात तक्रार दाखल

Subscribe

संजय दत्तची भूमिकेत दिसणाऱ्या रणबीर कपूरला सध्या ‘संजू’ चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून ट्रेलर रिलीज झाल्यानंतर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील त्याचं बालपण, स्टार्सचा मुलगा म्हणून असलेलं त्याचं अस्तित्व, त्याच्या आयुष्यातील ड्रग घेतल्यामुळं आलेला वाईट काळ, त्याच्या गर्लफ्रेंड्स आणि १९९३ मधील बॉम्ब ब्लास्टमधील अवैध शस्त्र बाळगण्याप्रकरणात असलेला त्याचा सहभाग या सगळ्यांच चित्रण करण्यात आलं आहे.

चित्रपटातील ‘या’ सीनमुळं रणबीर कपूरविरोधात तक्रार

राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात ‘टॉयलेट लीकेज’चा एक सीन दाखवण्यात आला आहे. जो सीन चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत असून याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. संघर्ष फाऊंडेशनच्या पृथ्वी म्हस्के यांनी या सीनमुळं तुरुंगातील अधिकाऱ्यांना वाईट दर्शवण्यात आलं असल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या सीनमुळं भारतीय तुरुंगातील अधिकाऱ्यांची प्रतिमा वाईट ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सीबीएफसीनं या सीनला मान्यता दिली आहे. त्यामुळं हे पत्र सीबीएफसी अध्यक्ष प्रसून जोशी, अभिनेता रणबीर कपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना उद्देशित केलं आहे.

- Advertisement -
complaint against ranbir kapoor'
रणबीर कपूरविरोधातील तक्रार

काय आहे हा सीन? काय आहे तक्रारीत?

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये संजय दत्तची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरला ज्या बराकमध्ये ठेवण्यात आलं होतं, तिथे टॉयलेट ओव्हरफ्लो झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तुरूंगातील बराकची भारतीय अधिकारी व्यवस्थित काळजी घेतात. आजपर्यंत तुरुंगात असलेल्या अनेक गँगस्टर्सवर चित्रपट आले आहेत मात्र असे सीन कधीही दाखवण्यात आले नाहीत. तसंच हा सीन चित्रपटातून काढून टाकण्याची मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे. हा सीन काढून न टाकल्यास, या चित्रपटाविरोधात न्यायालयात जावं लागेल असं मतही पृथ्वी म्हस्के यांनी तक्रारीत व्यक्त केलं आहे.

‘संजू’ चित्रपटात रणबीर कपूरबरोबर परेश रावल, मनीषा कोईराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, सोनम कपूर अशी स्टार्सची मंदियाळी असून हा चित्रपट २९ जूनला प्रदर्शित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -