घरताज्या घडामोडीकोरोनायोद्धा अभिनेत्री शिखा मल्होत्राला लकव्याचा झटका

कोरोनायोद्धा अभिनेत्री शिखा मल्होत्राला लकव्याचा झटका

Subscribe

शिखा मलहोत्रा ही अभिनेत्रीसोबतच एक सर्टीफाइड नर्सही होती. कोरोना काळात तिने मुंबईच्या हिंदू ह्रदय सम्राट ट्रोमा सेंटरमध्ये कोरोना रूग्णांची सेवा केली होती. गेली सहा महिने रूग्णांची सेवा केल्यानंतर काल अचानक शिखाला लकव्याचा झटका आला आहे.

बॉलिवुड अभिनेत्री शिखा मल्होत्राला गुरूवारी रात्री लकव्याचा झटका आला आहे. शिखाला मुंबईच्या कूपर रूग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. शिखा मल्होत्रा ही अभिनेत्रीसोबतच एक सर्टीफाइड नर्सही होती. कोरोना काळात तिने मुंबईच्या हिंदू ह्रदय सम्राट ट्रोमा सेंटरमध्ये कोरोना रूग्णांची सेवा केली होती. गेली सहा महिने रूग्णांची सेवा केल्यानंतर काल अचानक शिखाला लकव्याचा झटका आला आहे. शिखाच्या सोशल मीडियावरून ही माहिती तिच्या चाहत्यांना देण्यात आली. शिखाच्या या बातमीमुळे तिच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तिच्या निरोगी जिवनासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहे.

कोरोना काळात रूग्णांची सेवा करताना ऑक्टोबर महिन्यात शिखा स्वत:ही कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. योग्य उपचार घेऊन शिखाला २२ ऑक्टोबरला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. कोरोनातून बाहेर येऊन काही दिवस होत नाही तर शिखाला लकव्याचा झटका आला आहे. लकव्याचा झटका आल्यानंतर शिखाला त्वरित मुंबईच्या कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रूग्णालयातील उपचार महागडे असल्याने शिखाला विले पार्लेच्या कूपर रूग्णालयात शिफ्ट करण्यात आले.

- Advertisement -

शिखाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुरूवारी अचानक शिखाला लकव्याचा झटका आला. तिच्यावर कूपर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शिखाच्या शरीराच्या उजव्या भागात लकव्याचा झटका आला आहे. लकव्याच्या झटक्यामुळे शिखा चालण्या- फिरण्याच्या अवस्थेत नाही. त्याचप्रमाणे ती नीट बालूही शकत नाहीय. परंतु शिखाची प्रकृती आता पहिल्यापेक्षा बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

शिखाने गेल्या वर्षीच ‘हिरोपंती’ सिनेमात ‘कांचली’ नावाची व्यक्तीरेखा साकारली होती. त्याचबरोबर शाहरूख खानच्या ‘फॅन’, तर तापसी पन्नूच्या ‘रगिंन शादी.कॉम’ या सिनेमात शिखाचा दमदार अभिनय पाहायला मिळाला होता. कोरोनाच्या आजारातून बाहेर केवळ एका महिन्यातच शिखाला लकव्याचा झटका आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – येत्या रविवारी ‘या’ मालिकांसाठी राखून ठेवा तुमची संध्याकाळ!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -