घरट्रेंडिंगVIDEO: याला म्हणतात आत्मनिर्भर, स्वत:च्याच हातानी कापले स्वत:चे केस

VIDEO: याला म्हणतात आत्मनिर्भर, स्वत:च्याच हातानी कापले स्वत:चे केस

Subscribe

जगातील अनेकांनी आपल्या कलेने सर्वांना हैराण करुन सोडले आहे. अनेकांनी रेकॉर्ड करुन आपले नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक असा व्हीडिओ व्हायरल होत आहे ज्याने तुम्हालाही धक्का बसेल. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती आत्मनिर्भर होत स्वत: च सलूनमध्ये स्वत:चे केस कापतोय. या व्हीडिओने सर्वच हैराण झाले आहेत.

- Advertisement -

अवनीश शरण नावाच्या एका युजरने हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत असून चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हीडिओमध्ये ही व्यक्ती सलूनमध्ये खुर्चीवर बसली असून स्वतः कंगवा आणि कात्रीच्या मदतीने आपले केस कापतोय. या व्हीडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत २ लाख ४३ हजार लोकांनी व्हीडिओ पाहिला आहे.

ही व्यक्ती अगदी प्रोफेशनल व्यक्तीप्रमाणे आपले स्वतःचे केस कापून तो मोकळा होतो. आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्याला हव्या त्या स्टाईलमध्ये हा व्यक्ती केस कापताना दिसून येत आहे. केवळ आपले केस हा व्यक्ती कापत नाही आहे तर वस्तरा घेऊन आजूबाजूचे राहिलेले केस देखील छान पद्धतीने कापतो.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -