काय? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेन परत येणार…सुंदरलालने केला खुलासा

मालिकेतील दयाच्या पात्राला अभिनेत्री दिशा वकानीने पुरेपुर न्याय दिला आहे. मालिकेतील दयाच्या स्वभावातील खरेपणा, गोडवा आणि खट्याळ अंदाजाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दया हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत दिसून आली नाही कारण

हिंदी टेलिव्हिजन वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून भारतासह जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडलेली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील मुख्य पात्र जेठालाल आणि दयाच्या जोडीला हिंदी टेलिव्हिजन वरील प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. मालिकेतील दयाच्या पात्राला अभिनेत्री दिशा वकानीने पुरेपुर न्याय दिला आहे. मालिकेतील दयाच्या स्वभावातील खरेपणा, गोडवा आणि खट्याळ अंदाजाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दया हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत दिसून आली नाही.अभिनेत्री दिशा वाकानीने काही काळासाठी मालिकेतून खूप मोठ्ठा ब्रेक घेतला होता. मात्र आता अनेक दिवसांपासून प्रेक्षक दयाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता एक नवी बातमी समोर आली आहे.

दया परत येणार

मालिकेतील जेठालालची भूमिका साकरणऱ्या अभिनेता दिलीप जोशीने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “त्या परत येणार आहे की नाही हे फक्त प्रोडक्शन हाऊसलाच माहित आहे, आणि मला यात सहभागी नाही व्हायचं”. मात्र आता प्रेक्षकांसाठी एक प्रोमो दाखवण्यात आला आहे. ज्यातून दया परत येणार असल्याची हिंट देण्यात आली आहे. या प्रोमोमध्ये सुंदरलाल दयाला अहमदाबादवरून मुंबईला घेऊन येणार असल्याचे सांगतो. दया परत येणार असल्याची बातमी कळताच जेठालाल खूप खूश झाला आहे.

दयाची भूमिका कोण साकारणार?
सूत्रांच्या मते मागील काही दिवसांपासून मालिकेचे निर्माते अभिनेत्री दिशा वकानीला मालिकेत परत आणण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत होते. दरम्यान या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी दयाची भूमिका साकरण्यासाठी दिशा वाकानी किंवा दुसऱ्या नव्या अभिनेत्रीची निवड करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे दयाची भूमिका नक्की कोण साकारणार हे प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी बाब आहे.

 


 हेही वाचा :http://सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने दिली नात्याची कबुली; पोस्ट शेअर करून केला खुलासा