घरमनोरंजनदीपिका झळकणार सीतेच्या भूमिकेत

दीपिका झळकणार सीतेच्या भूमिकेत

Subscribe

बऱ्याच दिवसांपासून प्रसिद्ध पौराणिक कथेवर आधारित ‘रामायण’ या चित्रपट कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाच्या नावाची जरी घोषणा झाली असली तरी य़ात कोणती स्टारकास्ट पाहायलाा मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यात काही दिवसांपूर्वी ‘राम’ भूमिकेसाठी हृतिक रोशनने होकार दिल्याचे वृत्त होते. तर ‘सीता’ या भूमिकेसाठी निर्माते मधू मंटेना यांनी दीपिकाच्या नावाची निवड केली असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र अद्यापही दिग्दर्शकांनी भूमिकेविषयी कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही.

या चित्रपटाबद्दल एका मुलाखतीत मधू मंटेना यांनी सांगितले की, रामायण चित्रपटावर सध्या जोरदार काम सुरु आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत चित्रपटासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल. परंतु या चित्रपटात भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली स्टारकास्ट पहायला मिळेल. २०१७ मध्ये मधू मंटेना यांनी अल्लू अरविंद आणि नमित मल्होत्रा ​​यांच्यासारख्या निर्मात्यांबरोबर ‘रामायण’ ३ डी बनवण्याची घोषणा केली होती. दरम्यान काही दिवसांनी अशी माहिती समोर आली की ‘दंगल’ फेम नितेश तिवारी ‘मॉम’ दिग्दर्शक रवी उदयवर यांच्यासमवेत या चित्रपटाचे दिग्दर्शन केले जाणार आहे. तसेच ‘अंधाधुन’ चित्रपटाचे निर्माते श्रीराम राघवन यांचे बंधु लेखक श्रीधर राघवन यांच्याकडे चित्रपटाच्या कथालेखनाचे काम सोपवण्यात आले आहे. इतक्या तयारीने सुरु झालेला या चित्रपटाची गेल्या दोन वर्षापासून चर्चा आहे. मात्र मध्यंतरी या चित्रपटावरील काम थांबले असा सांगितले जाऊ लागले. मात्र या चर्चांना पूर्णविराम देत मधू मंटेना म्हणाले की, या चित्रपटावर सतत काम चालू आहे. ‘रामायण’ हा असा चित्रपट बनवायचा आहे, जो जगभरातील प्रेक्षक पाहू शकतील आणि त्याला समजू शकतील.

- Advertisement -

तर पुढे मधू सांगतात, गेली दोन वर्षे जगभरातील २०० हून अधिक कलाकार या चित्रपटावर काम करत आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते भव्यतेपर्यंत संपूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यामुळे भारतात आतापर्यंत बनविण्यात आलेला हा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे वृत्त आहे. हा चित्रपट पौराणिक कथेवर आधरित या चित्रपटाचे चित्रिकरण ३डी मध्ये होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाचे बजेट ६०० कोटी रुपयांचे असणार असल्याचे वृत्त आहे. परंतु मधु मंटेना आपल्या मुलाखतीत कोणत्याही आकडेवारीचा उल्लेख करणे टाळतात.

या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि महेश बाबू झळकणार असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. हे तिघेजण रामायणातील राम, सीता आणि रावण ही पात्रे साकारणार असल्याची माहिती पुढे आली. मात्र या कास्टिंगबद्दल सांगणे मधू यांनी टाळले. मात्र हे अंदाज चुकीचे आहेत असेही म्हटले नाही. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत या चित्रपटातील स्टारकास्टचची घोषणा होईल, तसेच ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी कास्टिंग असणार आहे. या चित्रपटात फक्त बॉलिवूड स्टारचं नाही तर देशभरातील सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकार कास्ट केले जातील.ट

- Advertisement -

सध्या ‘रामायण’ चित्रपटाची चर्चा सुरु असतानाच मधू मंटेना दीपिका पादुकोणसह ‘महाभारत’ आधारित चित्रपट निर्मित करण्याच्या तयारीत आहेत. यात द्रौपदीच्या दृष्टिकोनातून ‘महाभारत’ ची कथा दाखवली जाईल. मधु आणि दीपिका एकत्र या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मधु यांनी सांगितले की, त्यांची टीम ‘द्रौपदी’ बद्दल सतत संशोधन करत आहे. सध्या या चित्रपटाच्या पटकथेला अंतिम रूप दिले जात आहे. पण ‘रामायण’ नंतरचं‘द्रौपदी’ चित्रपटावक काम सुरू होईल. या चित्रपटात दीपिका पादुकोण ‘द्रौपदी’ची भूमिका साकारणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -