घरमनोरंजनफक्त मराठी सिने सन्मान पुरस्कारात 'धर्मवीर'ची बाजी; पटकावले ७ पुरस्कार

फक्त मराठी सिने सन्मान पुरस्कारात ‘धर्मवीर’ची बाजी; पटकावले ७ पुरस्कार

Subscribe

या चित्रपटच्या शिरपेचात आत आणखी एक यशाचा तुरा रोवला गेला आहे. फक्त मराठी सिने सन्मान पुरस्कार सोहळ्यात 'धर्मवीर' चित्रपटाला तब्बल ७ पुरस्कार मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर- पुकाम पोस्ट ठाणे'(dharmaveer) हा धर्मवीर आनंद दिघे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातूनच उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात आनंद दिघे(anand dighe) यांची मुख्य व्यक्तिरेखा अभिनेता प्रसाद ओक(prasad oak) याने साकारली. प्रसादच्या कामाचं सुद्धा खूप कौतुक झालं. या चित्रपटच्या शिरपेचात आत आणखी एक यशाचा तुरा रोवला गेला आहे. फक्त मराठी सिने सन्मान पुरस्कार सोहळ्यात ‘धर्मवीर’ चित्रपटाला तब्बल ७ पुरस्कार मिळाले आहेत.

हे ही वाचा – टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ यांनी दिली प्रतिक्रिया

- Advertisement -

ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना(shivsena) हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट “धर्मवीर” मुक्काम पोस्ट ठाणे…या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांसमोर मांडण्यात आला होता.१३ मे ला सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम लाभल्यानंतर आता या चित्रपटावर पुरस्कारांचाही वर्षाव होऊ लागला आहे.

हे ही वाचा –  आलियाच्या नव्या लूकवर अर्जुन कपूर इम्प्रेस; केलं भरभरून कौतुक

- Advertisement -

“फक्त मराठी सिने सन्मान २०२२” च्या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने तब्बल ७ पुरस्कार पटकावले आहेत. ज्यामध्ये सर्वात्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट लेखन प्रविण विठ्ठल तरडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रसाद ओक, सर्वोत्कृष्ट गीतलेखन मंगेश कांगणे, सर्वोत्कृष्ट गायक आदर्श शिंदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा विद्याधर भट्टे यांना मिळाले आहेत.

 'Dharmaveer'

अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने “धर्मवीर” या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.स्वरूप स्टुडिओजने लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहिलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी(gashmir mahajani), क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे आदींच्या भूमिका आहेत.

हे ही वाचा –  ‘तुम्हाला घरचंच जेवण लागतं;’ चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ सल्ल्यावर सुप्रिया सुळेंचं मजेशीर उत्तर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -