घरमनोरंजनडिज्नी हॉटस्टारने ॲक्शन-ड्रामा सीरिज 'शूरवीर'ची केली घोषणा!

डिज्नी हॉटस्टारने ॲक्शन-ड्रामा सीरिज ‘शूरवीर’ची केली घोषणा!

Subscribe

जगरनॉट प्रॉडक्शन निर्मित, समर खान निर्मित आणि कनिष्क वर्मा दिग्दर्शित, ही काल्पनिक मालिका केवळ डिज्नी+ हॉटस्टारवर हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगालीमध्ये लवकरच येत आहे

आपल्या देशाच्या संरक्षणासाठी हवाई दल, नौदल आणि लष्करातील सर्वात प्रभावी आणि बलवान अधिकारी एकत्र येऊ शकतात का? डिज्नी+ हॉटस्टार तुमच्यासाठी त्यांच्या आगामी हाय ऑक्टेन अॅक्शन ड्रामा हॉटस्टार स्पेशल ‘शूरवीर’मध्ये, भारतातील सर्वोच्च संरक्षण दलातील सर्वोत्कृष्ट इलिट टास्क फोर्स घेऊन येत आहे. जगरनॉट प्रॉडक्शन निर्मित, समर खान निर्मित आणि कनिष्क वर्मा दिग्दर्शित, ही काल्पनिक मालिका केवळ डिज्नी+ हॉटस्टारवर हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगालीमध्ये लवकरच येत आहे.

अभिनेता मकरंद देशपांडे, मनीष चौधरी, रेजिना कॅसांड्रा, अरमान रल्हान, आदिल खान, अभिषेक साहा, अंजली बारोट, कुलदीप सरीन, आरिफ झकेरिया, फैसल रशीद, साहिल मेहता आणि शिव्या पठाणी हे दिग्गज कलाकार देशविघातक चोरट्या कारवाया, प्रखर लष्करी प्रशिक्षण, हवाई लढाई आणि बुद्धिमान योजना आदींवरील कथा सादर करण्यासाठी एकत्र आले असून महत्त्वाचे म्हणजे ही कथा आपल्याला या अभिजात सैनिकांमधील मानवी संबंधांची कथा सांगते.

- Advertisement -

ख्यातनाम अभिनेते मकरंद देशपांडे म्हणाले, “शूरवीरने लष्कर, नौदल आणि हवाई दलातील उत्तम लोकांना एक टीम म्हणून एकत्रआणले ज्यामुळे मला या कथेत स्वारस्य निर्माण झाले. यातील माझी आणि मनीष चौधरीची व्यक्तिरेखा या टीमला भारतातील सर्वोत्कृष्ट संरक्षण दल बनवणे आणि त्यांना संरक्षणाची पहिली फळी म्हणून अबाधित ठेवणे, हे आहे. मालिकेचे चित्रीकरण करताना सर्व प्रतिभावान कलाकारांकडून शिकण्याचा एक अद्भुत प्रवास होता. डिज्नी+ हॉटस्टारवर ही मालिका प्रदर्शित होत आहे यामुळे मी खरोखरच खूप रोमांचित झालो आहे कारण त्यामुळे आम्हाला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.”

- Advertisement -

 

हेही वाचा :‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या गाण्यांची सांगीतिक मैफल प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -