Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन सर्वांनी प्रार्थना करा... ऋषभ पंतसाठी उर्वशीच्या आईची सोशल मीडियावर पोस्ट

सर्वांनी प्रार्थना करा… ऋषभ पंतसाठी उर्वशीच्या आईची सोशल मीडियावर पोस्ट

Subscribe

टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याच्या गाडीला शुक्रवारी पहाटे मोठा अपघात झाला. रुरकी येथे ऋषभ पंतची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे भस्मसात झाली. कारची काच फोडून पंत यांना बाहेर काढले आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, ऋषभ लवकरच ठीक होईल. दरम्यान, अशातच शुक्रवारी ऋषभच्या अपघातानंतर अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेलाने तिचा एक सुंदर फोटो शेअर केला होता ज्यात खाली कॅप्शनमध्ये प्रार्थना असं लिहिलं होतं. नेटकऱ्यांच्या मते उर्वशीची ती पोस्ट ऋषभ साठी होती. अशातच आता उर्वशीच्या आईने देखील आता ऋषभसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

उर्वशीच्या आईची पोस्ट चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera Rautela (@meera_rautela)

- Advertisement -

उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ऋषभच्या अपघाताची बातमी समोर येताचं ऋषभसाठी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ऋषभचा एक फोटो शेअर केला असून खाली कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, “सोशल मीडियावरील अफवा एकीकडे आणि तुम्ही स्वस्थ व्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचे नाव मोठे करा दुसरी कडे. सिद्धबलिबाबा तुमच्यावर विशेष कृपा करेल. सर्वांनी प्रार्थना करा.”

मीरा रौतेला यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करु लागले आहेत. त्यातील एका युजरने लिहिलंय की, “सासूचा आर्शिवाद नेहमी कामाला येतो.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, जावईबापू तुम्ही ठीक होणार, काळजी करु नका.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “आधी मुलगी आणि आता आई पण.”

- Advertisement -

कसा झाला ऋषभचा अपघात
दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी ऋषभ पंत परतत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास रुरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपूरजवळ हा अपघात झाला. पंत याची मर्सिडीज गाडी सुसाट वेगात होती आणि दुभाजकाला आदळल्यानंतर रेलिंग तोडून गाडी पलीकडे गेली. वेग जास्त असल्याने सुमारे 200 मीटरवर जाऊन ही कार थांबली. त्यानंतर तिला आग लागली. ऋषभ पंत ज्या कारमधून घरी परतत होता, त्या गाडीचा नंबर प्लेट आहे.

 


हेही वाचा :

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -