घरमनोरंजन‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

Subscribe

‘द लेजंड ऑफ भगत सिंह’, ‘दामिनी’, ‘घायल’ आणि ‘खाकी’ यांसारच्या थ्रिलर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे राजकुमार संतोषी 9 वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शन करणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची घोषणा झाली होती शिवाय पोस्टर देखील करण्यात आली होतं. दरम्यान, आता या चित्रपटाचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

1 मिनिट 32 सेकंदाच्या या टीझरच्या सुरुवातीला गांधीजी आणि गोडसे यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. गांधींजीची ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती. तिथेच गोडसेंचा आवाज दाबण्यात आला. त्यांना त्यांच मत मांडण्याची सवड कोणीच दिली नाही. परंतु या चित्रपटात ते सर्व दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यातील समोरासमोर होणारे संवाद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवायं त्यांचे मतभेद कोणत्या गोष्टीवरुन व्हायचे. गांधीजी त्यांना आपल्या गोष्टी समजवायचा प्रयत्न करायचे आणि त्या गोष्टींना नथुराम गोडसे कसे तर्क लावून विरोध करायचे. हे सर्व या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

या टीझरमध्ये महात्मा गांधी म्हणतात की, जर मानवतेला वाचवायचं असेल तर प्रत्येक प्रकारच्या हिंसेला सोडावं लागेल. तेव्हा टीझरमध्ये नथुराम गोडसे गांधीजींच्या आमरण उपोषणावर प्रश्न उपस्थित करत म्हणातात की, त्यांच्या कडे एक घातक हत्यार आहे ज्याच नाव आमरण उपोषण आहे. याचा ते सतत वापर करुन आपल्या गोष्टी खऱ्या करुन घेतात. ही एक प्रकारती हिंसाच आहे. मानसिक हिंसा.

- Advertisement -

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटामध्ये नथुराम गोडसे यांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसत आहे. तर महात्मा गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता दीपक अंतानी दिसून येत आहे. हा चित्रपट येत्या 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

समंथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -