घरमनोरंजनबॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक संजय चौहान यांचे वयाच्या 62 वर्षी निधन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक संजय चौहान यांचे वयाच्या 62 वर्षी निधन

Subscribe

बॉलिवूड मधील प्रसिद्ध लेखक संजय चौहान यांचे निधन झाले आहे. त्यांनी 62 व्या वर्षी मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. संजय चौहान मागील काही दिवसांपासून लिव्हर संबंधी आजाराचा सामना करत होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सरिता आणि मुलगी सारा आहे. दरम्यान, आज दुपारी 12.30 वाजता मुंबईतील ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

संजय चौहान यांना बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे लेखन केले होते. त्यांनी लिहिलेल्या 2011 मधील ‘आय एम कलाम’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यांनी ‘मैंने गांधी को नहीं मारा’ आणि ‘धूप’ यांसारख्या चित्रपटाचे जबरदस्त लेखन केले होते. तसेच त्यांनी ‘पान सिंह तोमर’, ‘साहेब बीवी गैंगस्टर’ यांसारख्या अनेक चित्रपटाचे लेखन केले.

- Advertisement -

पत्रकार म्हणून केली करिअरची सुरुवात
संजय चौहान यांचा जन्म मध्यप्रदेशात झाला होता. त्यांचे वडील रेल्वेत कामाला होते. संजय यांनी पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 1990 साली सोनी टीव्हीवरील एका मालिकेच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर हळूहळू लेखन देखील करु लागले.

 

- Advertisement -

हेही वाचा :

दिवंगत मायकल जॅक्सनची पूर्व पत्नी लिसा प्रेस्लीचं निधन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -