ऑस्ट्रेलिया कॉन्सर्ट रद्द होताच फरहान अख्तरकडे चाहत्यांनी मागितले पैसे

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर अभिनय आणि दिग्दर्शनासोबतच एक गायक देखील आहे. त्याने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये गायन देखील केले आहे. फरहान अख्तरचा एक बँड देखील आहे. ज्याचे विविध ठिकाणी कॉन्सर्ट होत असतात. या महिन्यामध्ये देखील ऑस्ट्रेलियामध्ये एक कॉन्सर्ट होणार होता जो आता रद्द करण्यात आला आहे. याबाबत स्वतः फरहानने माहिती दिली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवरुन स्वतः याबाबत सांगितलं की आहे. शो रद्द करावा लागल्यामुळे फरहान खूप भावूक झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

फरहान अख्तरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं की, “माझे ऑस्ट्रेलियाचे चाहते, काही कारणांमुळे आमचा बँड फरहान लाईव्हला आमचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करावा लागत आहे. या आठवड्याच्या शेवटी आम्ही सिडनी आणि मेलबर्नला येऊ शकणार नाही. याबद्दल मी माझी निराशा तुमच्याशी समोर व्यक्त करतोय. आम्ही आशा करतो की भविष्यात नक्कीच तुमच्या सुंदर शहरात येऊन तुमच्यासाठी सादरीकरण करु.” असं फरहानने लिहिलंय.

दरम्यान, फरहानची ही पोस्ट पाहून त्याचे चाहते नाराज झाले आहेत. काहीजण त्याचे सांत्वन देखील करत आहेत. एका चाहत्याने लिहिलंय की, आम्ही या कॉन्सर्टसाठी खूप उत्सुक होतो. तर दुसऱ्याने लिहिलंय की, तुम्ही शो रद्द का केला? तर तिसऱ्याने लिहिलंय की, आम्हाला आमचे पैसे परत करा.”

फरहानचे आगामी चित्रपट

आगामी काळात फरहान अख्तर ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कटरीना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियंका चोपडा मुख्य भूमिकेत असणार आहे.

 


हेही वाचा :

अकबरबद्दल सांगितला जाणार इतिहास चुकीचा… नसिरुद्दीन शाहांचं वक्तव्य