घरमनोरंजनश्रीरामांच्या योद्धा अवतारातील 'आदिपुरुष'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

श्रीरामांच्या योद्धा अवतारातील ‘आदिपुरुष’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Subscribe

आदिपुरूष चित्रपटात अभिनेता प्रभास आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत असणार आहे. या फर्स्ट लूकमध्ये प्रभासची खास झलक पाहायला मिळत आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र नवरात्रीचा जल्लोष सुरू आहे. याचं निमित्ताने आज सकाळी सकाळी निर्मात्यांनी आदिपुरुष चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. आदिपुरूष चित्रपटात अभिनेता प्रभास आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत असणार आहे. या फर्स्ट लूकमध्ये प्रभासची खास झलक पाहायला मिळत आहे.

निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केलंय ज्या पोस्टरमध्ये प्रभास श्रीरामांच्या भूमिकेमध्ये गुडघ्यावर जमीनीवर बसला असून वर आकाशाकडे पाहत आहे. त्याच्या हातामध्ये धनुष्य-बाण देखील दिसत आहे. प्रभासचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून विविध पाच भाषांमध्ये पोस्टर शेअर केले आहे.

- Advertisement -

प्रभासने शेअर केला चित्रपटाचा फर्स्ट लूक


टॉलिवूड सुपरस्टार प्रभासने पोस्टर शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “सुरूवात, अयोध्या, यूपीमधील शरयू नदीच्या तटावर जादूई प्रवास सुरू करण्यासाठी आमच्यासोबत या. आमचा चित्रपट ‘आदिपुरूष’च्या पोस्टरच आणि टीझरचे अनावरण 2 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी अयोध्येमध्ये होणार आहे. ‘आदिपुरूष’ 12 जानेवारी 2023 ला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित.”

- Advertisement -

‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास श्रीरामांची आणि कृति सेनन सीतेची भूमिका साकारणार आहे. तसेच अभिनेता सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सुरुवातीला सैफ अली खानच्या या व्यक्तिरेखेला खूप विरोध झाला होता. परंतु या चित्रपटातील त्याची भूमिका पाहण्यासाठी सैफचे चाहतेही आता खूप उत्सुक आहेत.

हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा ५ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

या मराठमोळ्या अभिनेत्रींचा आहे बॉलिवूडमध्ये डंका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -