घरमनोरंजनपोलिसांमुळे माझे कपडे फाटले; गहना वशिष्ठने केला मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

पोलिसांमुळे माझे कपडे फाटले; गहना वशिष्ठने केला मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Subscribe

गहनाने तिच्या इस्टाग्राम अकाऊटवर एक भली मोठी पोस्ट करत पोलिसांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने पोस्टमध्ये लिहले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला(raj kundar) पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. या प्रकरणी राज कुंद्रासह अभिनेत्री गहना वशिष्ठावरही(Gehana Vasisth )गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ‘गंदी बात’ फेम गहनाला फेब्रुवारी महिन्यात पॉर्न चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, मात्र याप्रकरणातून गहना जामीनावर बाहेर आली. आता गहनाने तिच्या इस्टाग्राम अकाऊटवर एक भली मोठी पोस्ट करत मुंबई पोलिसांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने पोस्टमध्ये लिहले आहे.(Gehana Vasisth Alleges mumbai Policemen For Her Plight Condition)

गहनाने पोस्ट केलेल्या फोटो मध्ये तिचे कपडे फाटले असल्याचे दितसतेय तसेच गहनाने लिहलं आहे की, “पोलिसांनी माझी ही दुर्दशा केली आहे. माझे सर्व अकांऊट फ्रीज केले आहेत. माझ्या जवळ काहीच पैसै शिल्लक नाहीये तसेच मी घरी देखील जाऊ शकत नाही नाहीतर पोलिस मला पुन्हा अटक करतील, मोबाईल ,लॅपटॉप सर्व वस्तू पोलिसांकडे आहेत. गेल्या वेळीस जामिनासाठी मी कार गहान ठेवली होती. मी सध्या अनोळखी लोकांसोबत राहत आहे. माझ्या घरावर अज्ञात लोकांनी ताबा केला आहे. वकीलाचे पैसे देखील कर्ज घेऊन चुकवले आहेत. आणि यापेक्षा अधीक मुंबई पोलिस काय करु शकतात. या पेक्षा जास्त काय बिघडवू शकतात ते.”तसेच गहनाने मुंबई पोलिसांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप लावला आहे.

पोस्ट पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Gehana Vasisth (@gehana_vasisth)

- Advertisement -

गहना वशिष्ठा राज कुंद्राच्या कंपनीसोबत काम करत होती. या कंपनीच्या पॉर्न फिल्मच्या दिग्दर्शनाची जबाबदारी गहना सांभाळायची. यासह तिने अनेक पॉर्न चित्रपटांमध्येही काम केलं असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यापासून गेली ४ महिने गहना तुरुंगात होती. तेव्हापासून मुंबई पोलीस पॉर्न फिल्म रॅकेटमधील आरोपींचा शोध घेत होते. यात मुंबई पोलिसांच्या तपासात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचे नाव समोर आले. यामुळे पॉर्न फिल्म चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप रॅकेटचा भांडाफोड झाला.

- Advertisement -

हे हि वाचा – तब्येत ठिक नसल्याचे कारण देत हनी सिंगने कोर्टात मारली दांडी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -