घरमनोरंजनMoneyHeist सिरिजच्या चाहत्यांसाठी खुशखबर,'या' तारखेला रिलीज होणार पाचवा सीझन!

MoneyHeist सिरिजच्या चाहत्यांसाठी खुशखबर,’या’ तारखेला रिलीज होणार पाचवा सीझन!

Subscribe

स्पॅनिश भाषेत असलेल्या या सरीजचे चारही सीझन प्रचंड हिट ठरले आहेत. चोरी करताना घातलेला मास्क आणि बेला चओ हे गाण यातील मुख्य आकर्षण होती असे बोलले तरी हरकत नाही.

जगभरात सध्या सर्व दर्शकांच्या पसंतीस उतरलेली वेब सिरिज म्हणजे ‘मनी हाईस्ट'(Money Heist 5). देशातील अनेक कानाकोपर्‍यात या सिरिजने चाहत्यांना खूळ लावले आहे. मनी हाईस्ट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या लोकप्रिय वेब सिरिजचा पाचवा भाग लवकरच भेटीला येणार आहे. ‘मनी हाईस्ट’ या सिरिजचे चाहते याच्या पाचव्या सीझनची अतुरतेने वाट पाहत होते. कारण हा सीझन शेवटचा असणार आहे. अखेर नेटफ्लिक्सने ‘मनी हाईस्ट’ च्या रिलीजची घोषणा केली आहे. हा सीझन दोन भागात विभागण्यात आला आहे. पहिला भाग 3 सप्टेंबर 2021 आणि दूसरा 3 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडिया अकाऊंटवर सिरिजचे पोस्टर आणि टीजर शेअर करत रिलीज डेटची घोषणा केली आहे.
सिरिजच्या इतिहासाबद्दल वेब सिरिज प्रेमींनातर आधीपासूनच ठाऊक असेलच तरीही थोडक्यात जाणून घेऊया. मनी हाईस्ट सर्वप्रथम स्पॅनिश टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आली होती. आणि तेव्हा सिरिज प्रेक्षकांसमोर काही खास कमाल दाखवू शकली नाही. सिरिज पूर्णतः फ्लॉप ठरली. विशेष बाब म्हणजे मेकर्सने या सिरिजच्या दुसर्‍या सीझन देखील बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर नेटफ्लिक्सने ही सिरिज खरेदी केल्यानंतर अतिशय लोकप्रिय झाली. चाहत्यांमध्ये याची लोकप्रियता वाढू लागली. सुरूवातीला ज्या सिरिजचे प्रमोशन देखील झाले नव्हते त्या सिरिजची क्रेझ लोकांमध्ये वाढू लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

- Advertisement -

स्पॅनिश भाषेत असलेल्या या सरीजचे चारही सीझन प्रचंड हिट ठरले आहेत. चोरी करताना घातलेला मास्क आणि बेला चओ हे गाण यातील मुख्य आकर्षण होती असे बोलले तरी हरकत नाही. स्पॅनिश भाषेत असणार्‍या सिरिजचे नेटफ्लिक्सने इंग्रजी भाषेतरूपांतर केलं. गमवण्यासाठी काहीही नसलेल्या एका प्रोफेसर कडे विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र घेऊन चोरीचा मोठा प्लॅन बनवतो असे या सिरिजची मूळ कथा आहे.


हे हि वाचा – HBD:शर्मिला टागोरशी पहिल्यांदा बाथरोब मध्ये झाली होती कुणाल खेमूची भेट,वाचा मजेशीर किस्सा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -