Happy Birthday Swapnil Joshi: काय सांगता! श्रीकृष्णाच्या भूमिकेनंतर लोक स्वप्निलच्या पाया पडायचे, वाचा धम्माल किस्सा

त्या काळात स्वप्निल वठवलेली श्रीकृष्णाची आजही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात असून आजही श्रीकृष्ण म्हटल की स्वप्निल जोशीच डोळ्यांसमोर येऊन राहतो

Happy birthday swapnil joshi shri krishna serial fan quit smoking after touched his feet
Happy Birthday Swapnil Joshi: काय सांगता! श्रीकृष्णाच्या भूमिकेनंतर लोक स्वप्निलच्या पाया पडायचे, वाचा धम्माल किस्सा

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय. लहानपणीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या ह्रदयात आपली छाप सोडणारा अभिनेता स्वप्निल जोशी आज त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करत आहे. लहान वयातच स्वप्निलच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. रामानंद सागर यांच्या मालिकेत स्वप्निलने ‘कुश’ या भूमिकेतून सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केले आणि लहान वयात छोट्या पडद्यावर मोठे नाव मिळवले. आपल्या सहज सोप्या अभिनयाने स्वप्निलने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर १९९३ साली स्वप्निलने रामानंद यांच्याच मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने खऱ्या अर्थाने स्वप्निलचे नशीब बदलले.स्वप्निल श्रीकृष्णाच्या भूमिकेत राज्यातीलच नाही देशातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला. त्या काळात स्वप्निल वठवलेली श्रीकृष्णाची आजही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात असून आजही श्रीकृष्ण म्हटल की स्वप्निल जोशीच डोळ्यांसमोर येऊन राहतो. स्वप्निल देखील त्याच्या भूमिकेविषयी नेहमीच सांगत असतो. आज स्वप्निलच्या वाढदिवसानिमित्त श्री कृष्णाच्या भूमिकेचा स्वप्निलने सांगितलेला धम्माल किस्सा जाणून घेऊयात.

स्वप्निल जोशीने श्रीकृष्णाची भूमिका निभावल्यानंतर एका मुलाखतीत एक धम्माल किस्सा सांगितला होता. स्वप्निलने श्रीकृष्णाची भूमिका साकारली तेव्हा तो नुकताच कॉलेजला जायला लागला होता. मालिका संपली होती. मात्र प्रेक्षकांच्या डोक्यातून आणि मनातून काही स्वप्निल रुपी श्रीकृष्ण जात नव्हता. स्वप्निल म्हणाला, मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात होतो. तेव्हा माझा एक फॅन माझ्यासमोर आला आणि त्याने अचानक माझे पाय धरले आणि तो रडू लागला. हा प्रसंग माझ्यासाठी खुपच वेगळा होता.

स्वप्निलने पुढे असे म्हटले की, तो माणूस खूप वेळ रडत होता. थोड्या वेळाने तो माझ्याशी बालू लागाल. तो माणूस एक चेन स्मोकर होता. त्याने सिगरेट पिणे सोडले कारण तो देवाला घाबरत होता. जेव्हाही त्याला सिगरेट पिण्याची इच्छा होत असत तेव्हा माझ्या रुपातल्या श्रीकृष्णाची छबी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहत असत. हा प्रसंग खरोखर माझ्यासाठी अदभूत आणि वेगळा होता. या प्रसंगानंतर मी फार भावूक झालो होतो असे स्वप्निने सांगितले.

स्वप्निल जोशी रामायणानंतर आलेल्या उत्तर रामायणात काम केले. स्वप्निलचा चेहरा इतका बोलका आणि निरागस होता की रामानंदन सागर यांनी स्वप्निलची श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी निवड केली. प्रेक्षकांनी देखील स्वप्निलला खूप प्रेम दिले. १९९३ ते १९९६ च्या या काळात प्रसारित झालेली ही मालिका प्रेक्षकांनी चक्क डोक्यावर घेतली होती. श्रीकृष्णाच्या भूमिकेनंतर स्वप्निलचे आयुष्य खऱ्या अर्थाने बदलले होते. मात्र या मालिकेनंतर अनेक वर्ष स्वप्निल सिनेसृष्टीपासून दूर होता.


हेही वाचा – सलमान खानच्या Antim चा प्रदर्शनापूर्वी बोलबाला, चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला