घरमनोरंजन'पद्मावत'नंतर सलमान खानच्या 'लवरात्री'लाही विरोध

‘पद्मावत’नंतर सलमान खानच्या ‘लवरात्री’लाही विरोध

Subscribe

बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या निर्मितीत बनलेल्या 'लवरात्री' चित्रपटाला उत्तर प्रदेशमध्ये कडाडून विरोध होत आहे. काही विरोधकांनी सलमान खानचा पुतळा जाळून निदर्शनं केली.

बॉलीवूडच्या चित्रपटांना विरोध करण्याच्या घटना काही कमी नाही. काही महिन्यांपूर्वीच निर्माता- दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या पद्मावत चित्रपटाला करणी सेनेने कडाडून विरोध केला होता. त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटताना दिसले. आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. सुपरस्टार सलमान खान निर्मित ‘लवरात्री’ चित्रपटाला आता मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमधील हिंदू संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला असून बलिया येथे हिंदू जागरण मंचने सलमान खानचा पुतळा जाळून निदर्शन केल्याची घटनासमोर आली आहे.

सलमानचा पुतळा जाळला 

नवरात्रोत्सवाच्या काळात प्रदर्शीत होणाऱ्या ‘लवरात्री’च्या विरोधात बलिया येथे हिंदू जागरण मंचचे जिल्हाध्यक्ष मंगल देव चौबे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री हल्दी चट्टी येथे अभिनेता सलमान खानचा पुतळा जाळला. या वेळी मंगल देव म्हणाले की, हिंदू जागरण मंचचे कार्यकर्ता जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जाऊन या चित्रपटाचा विरोध करतील. हा सिनेमा आम्ही सिनेमागृहात चालू देणार नाही.

- Advertisement -
salman-lavratri
लवरात्री चित्रपटाला वाढता विरोध (प्रातिनिधीक चित्र)

हिंदू विश्व परिषदेनेही केलेला विरोध 

यांनी आरोप केला आहे की, चित्रपटाचे नाव त्यांच्या पवित्र सणाच्या नावाचे विडंबन करून ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट समाजासाठी घातक ठरू शकतो, असेही त्यांचे मत आहे. या पूर्वी हिंदू विश्व परिषदेनेही चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला होता. लवरात्री चित्रपटाची निर्मिती सलमान खान याने केली असून अभिराज मीनावाला यांनी दिग्दर्शन केले आहे. ही एक लव स्टोरी आहे. या चित्रपटातून सलमानचा मेहूणा आयुष शर्मा आणि वरीना हुसैन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याची टिम वाराणसीमध्ये दाखल झाली होती.

lovratri
लवरात्री चित्रपट (प्रातिनिधीक चित्र)

‘पद्मावत’ला करणी सेनेचा विरोध 

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग अभिनीत पद्मावत चित्रपटाला राजस्थानच्या करणी सेनेने कडाडून विरोध केला होता. त्यांनी जागोजागी तोडफोड, जाळपोळ, रास्तारोको, रेलरोको केला होता. हा चित्रपट प्रदर्शीत होऊ नये यासाठी त्यांनी अटोकाट प्रयत्न केले. देशभरातून राजकीय पक्षांनी या विरोधात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. अखेर निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली आणि ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -