घरमनोरंजन'देवमाणूस' मालिकेतील वंदी आत्याचे हॉट-ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल चकीत!

‘देवमाणूस’ मालिकेतील वंदी आत्याचे हॉट-ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल चकीत!

Subscribe

वंदी आत्याचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

मराठी टेलिव्हीजन विश्वात सध्या अनेक मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत त्यांचे मनोरंजन करण्यात यशश्वी ठरत आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध मालिका म्हणजे ‘देवमाणूस’ या मालिकेत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी पुरेपूर मालमसाला आहे. तसेच प्रत्येक भाग ऊत्कंठावर्धक,थरारक,रहस्यमय ठरत असल्याने मालिकेच्या टिआरपीमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. मालिकेच्या कथेसोबतच कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ‘देवमाणूस’ मालिकेतील प्रत्येक पात्र लोकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. आज्जीचे टोमणे,टोण्याची मस्ती,डिंम्पलची हूशारी,देवी सिंगचा चालाखपणा इतकच नाही तर मालिकेती प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने भूमिकेल चार चाँद लावले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. या मालिकेत सर्वच पात्रांनी भरपूर लोकप्रियता कमावली आहे. अशातच मालिकेतील वंदी आत्या हे पात्र साकारणारी अभिनेत्री पुष्पा चौधरी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि मॉडर्न आहे.(Hot-glamorous photos of Vandi Atya in ‘Devmanus’ serial )

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushpa Chaudhari (@pushpachaudhari03)

‘देवमाणूस’ मालिकेत पुष्पाने आपल्या गावरण,खूसकट अशा हटके अंदाजामुळे चांगलीच गाजत आहे.वंदी आत्याचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मालिकेत काम करण्यापुर्वी पुष्पाने अनेक सौंदर्यस्पर्धेत सहभाग घेत त्या स्पर्धा जिंकल्या आहेत. इतकचं नाही तर ‘बाबो या सिनेमात देखील त्यांनी काम केलं आहे. मात्र त्यांना खरी ओळख देवमाणूस या मालिकेतील वंदी आत्या या भूमिकेमुळे मिळाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

पुष्पा सोशल मीडीयावर प्रचंड ऑक्टिव असतात आपल्या सौंदर्यस्पर्धा आणि इतर कामाचे फोटो पुष्पा नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. अभिनयासोबतच पुष्पा यांना गायनाची देखील खूप आवड आहे. त्या सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडीओ शेअर करत असतात.



हे हि वाचा – आशा भोसले गाडीत ‘या’ गाण्याचा सराव करत असताना ड्रायवर म्हणाला, रुग्णालयात जायचं का?



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -