घरमनोरंजनLockDown: ३ जणांच्या उपस्थितीत ४ दिवसांत झाले सलमानच्या 'त्या' गाण्याचे शूटींग

LockDown: ३ जणांच्या उपस्थितीत ४ दिवसांत झाले सलमानच्या ‘त्या’ गाण्याचे शूटींग

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचे तेरे बिना हे नवंकोरं गाण काल सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. या गाण्यात सलमानसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील दिसत आहे. सध्या लॉकडाऊनचा काळ असून सलमानने हे गाण याच लॉकडाऊनमध्ये चित्रीत केले आहे. अवघ्या ४ दिवसांत केवळ ३ जणांच्या उपस्थितीत या गाण्याचे शूटिंग करण्यात आले असून हे गाण स्वतः सलमान खाननेच दिग्दर्शित केल्याचे सांगितले जात आहे.

असे केले शूटींग

सलमान खानने सांगितले की, हे गाणं त्यांच्या पनवेल येथील फार्महाऊसवर शूट करण्यात आले. तिथे कोणीही मदतनीस नव्हता. त्यामुळे त्यांनाच शूटींगची सर्व तयारी करावी लागली. शूटींगदरम्यान, सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस आणि एक डीओपी हे तिघेच उपस्थित होते. तसेच हे शूट त्यांनी चार दिवसांत पूर्ण केले. सायंकाळी साडेपाच ते सातच्या दरम्यान ते शूटींग करत होते. दरम्यान, मेकअप, ड्रेसिंग, हेअरस्टाईल हे सर्व कलाकारांनी स्वतःच केले. यावेळी जॅकलीनचा लुक एकदम नॅचरल ठेवण्यात आला होता. तसेच शूटींगचे लोकेशनही त्यांनी सजवले.

- Advertisement -

गेल्या दीड महिन्यांपासून पनवेलमध्ये असलेल्या सलमानने तेरे बिना हे गाणं चित्रीत केले असून त्यामुळे गाण्यातील सर्व लोकेशन हे पनवलेच्या फार्महाऊस आणि जवळपासच्या गावातील असल्याचे पाहायला मिळते. तलाव, शेत, घोडे, मोकळं मैदान, रस्ते, जंगल असे वातावरण यामध्ये दिसून येते. सलमान खानच्या कुटुंबियांसह काही कलाकार मंडळी आणि मित्र परिवारही या ठिकाणी उपस्थित असून त्यामध्ये जॅकलिनदेखील आहे. त्यामुळे या गाण्यात जॅकलिनला घेणे सहज शक्य झाले. हे गाणं सलमान खानच्याच निर्मितीत बनले असून ते त्यानेच गायले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -