Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी ऋतिकच्या नव्या गर्लफ्रेंडची रोशन कुटुंबियांसोबत झाली जबरदस्त बॉन्डिंग, पाहा व्हायरल फोटो

ऋतिकच्या नव्या गर्लफ्रेंडची रोशन कुटुंबियांसोबत झाली जबरदस्त बॉन्डिंग, पाहा व्हायरल फोटो

Subscribe

बॉलिवू़ड अभिनेता ऋतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड मधील अभिनेत्री आणि गायिका सबा आजाद हिच्याशी ऋतिकचं नाव जोडलं जात आहे. दोघांना एकमेकांसोबत फिरताना अनेकदा मिडियाने स्पॉट केलं आहे. दोघेही बऱ्याचदा डिनर डेटसाठी वारंवार भेटत असतात. परंतु अद्याप त्यांनी त्याच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

सोशल मिडियावर काही दिवसांपूर्वी त्यांचे डिनर डेट दरम्यानचे काही फोटो वायरल झाले होते. आता पुन्हा असाच एक नवीन फोटो सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे. या फोटोमध्ये ऋतिक आणि सबा सोबत ऋतिकच्या कुटुंबातील मंडळीसुद्धा दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajesh Roshan (@rajeshroshan24)

- Advertisement -

खरतंर हा फोटा २० फेब्रुवारीचा असून यादिवशी सबा ऋतिकच्या घरी सन्डे डिनरसाठी गेली होती. ऋतिकचे काका राजेश रोशन यांनी हा फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेयर केला आहे. हा फोटो शेयर करत त्यांनी लिहीलं, “सुख सभोवताली आहे, खासकरून रविवारी जेव्हा लंच टाईम असतो.” ऋतिक या पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हणाला, “एकदम खर आहे काका आणि तुमच्यासोबत खूप मज्जा आली.”

राजेशच्या या पोस्टवर सबाने सुद्धा उत्तर दिलं म्हणाली, “सगळ्यात चांगला सन्डे.” यातून स्पष्ट दिसून येतंय की सबाचं फक्त ऋतिक बरोबरंच नाही तर त्याच्या कुटुंबासोबत ही चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे. कारण या आधी सुद्धा ऋतिकच्या आधीच्या पत्नीने सोशल मिडियावर सबाचं कौतुक केलं होतं.

- Advertisement -

सबाच्या एका सिंगीग परफॉरमन्स वेळी सुजैन तिथे उपस्थित होती, तेव्हा तिने सबाच्या परफॉरमन्सचं कौतुक करत तिचा एक फोटो शेयर केला होता. अलीकडे सबा ‘रॉकेट बॉईज’ या वेब सीरीजमध्ये दिसून आली होती, तर ऋतिक त्याचा आगामी सिनेमा ‘विक्रम वेधा’ आणि ‘फाइटर’ यांमध्ये दिसून येणार आहे.


हेही वाचा – Dadasaheb Phalke Awards: ‘पुष्पा’ने मिळवला Film Of The Year 2022चा किताब


- Advertisment -