घरमनोरंजनआजारावर मात केल्यानंतर सोनाली बेंद्रेने केले फोटोशुट

आजारावर मात केल्यानंतर सोनाली बेंद्रेने केले फोटोशुट

Subscribe

कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारातून बचावल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेने फोटोशुट केले आहे. आपण अजूनही सुंदर असल्याचे तिने म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही अभिनय आणि सुंदरतेमुळे फॅन्समध्ये चर्चेत होती. मात्र आता ती अनेक लोकांना प्रेरणा देते आहे. सोनालीला कॅन्सर झाल्याच्या बातमीने तिच्या फॅन्सला आश्चर्यात टाकले होते. मात्र ज्या प्रकारे सोनालीने उपचाराला प्रतिसाद दिला आहे ती एक प्रेरणास्थान बनली आहे. सकारात्मक विचारांबरोबर तिने आपल्या उपचाराबद्दल नेहेमी माहिती दिली आहे. तिच्या आत्मविश्वासामुळे अनेकजण प्रोत्साहित झाले. उपचारानंतर सोनालीचा कॅन्सर बरा झाला असल्याचे सांगण्यात येत होते. नुकताच सोनालीने एक फोटो शुट केला आहे यामध्ये तिने स्वतःला सुंदर म्हणून घेतले आहे. या फोटोशुटमधील एका फोटोमध्ये सोनालीने आपल्या ऑपरेशनचे टाके दाखवले आहेत. तिचे हो फोटोशुट सोशल मीडियावर व्हायर झाले. फॅन्सने सोनालीच्या या फोटोंचे कौतुक केले आहे. सोनालीमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल अशा कमेंट तिच्या फॅन्सने टाकल्या आहे.

- Advertisement -

 

या फोटोमध्ये सोनालीने Givenchy ब्रँडचे मेटॅलिक ड्रेस घातली आहे. या ड्रेसमध्ये सर्जरीमध्ये झालेला कट दिसतो आहे. हा कट २० इंचचा आहे. कोणत्याही प्रकारचा न्युनगंड न पाळता तिने हा फोटो शेअर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -