घरमनोरंजनखऱ्या अर्थाने मला स्वातंत्र्याचा अर्थ कळला... तुरुंगातून बाहेर आल्यावर शीझानची प्रतिक्रिया

खऱ्या अर्थाने मला स्वातंत्र्याचा अर्थ कळला… तुरुंगातून बाहेर आल्यावर शीझानची प्रतिक्रिया

Subscribe

काही महिन्यांपूर्वी चर्चेत असलेल्या तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणातील संशयीत आरोपी शीजान खानला डिसेंबर 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शीजान खान पोलिसांच्या ताब्यात होता. अनेक जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शेवटी 70 दिवसानंतर 4 मार्च 2023 रोजी शीजानची एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली. अनेक दिवसांपासून शीजानच्या जामीनाचा अर्ज फेटाळला जात होता. त्याचे कुटुंबीय आणि वकील त्याला सोडवण्याचे अनेक प्रयत्न करत होते. मात्र, शनिवारी त्याची सुटका झाल्याने त्याचे कुटुंबीय आनंदी झाले आहेत.

अशातच आता एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शीजान म्हणाला की,”आज खऱ्या अर्थाने मला स्वातंत्र्याचा अर्थ कळाला आहे. आज मी स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकतो. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी जेव्हा माझ्या आईला आणि बहिणीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. पण आता मी माझ्या हक्काच्या माणसांसोबत असल्याने मला समाधान आहे”.

- Advertisement -

पुढे शीजान म्हणाला की, ,”मी आता माझ्या कुटुंबियांसोबत आहे. माझ्या माणसांसोबत मला आता वेळ घालवायचा आहे. आईच्या मांडीवर डोकं ठेवून मला झोपायचं आहे आणि तिच्या हातच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. मला तुनिषाची खूप आठवण येते. ती जिवंत असती तर आज माझ्यासाठी लढली असती”. असं शीजान म्हणाला.

आत्महत्येपूर्वी झाला होता तुनिषा-शीजानचा ब्रेकअप

Sheezan Khan granted bail in Tunisha Sharma death case - Hindustan Times‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या हिंदी मालिकेत तुनिषा आणि मुख्य भूमिका साकारत होते. मालिकेच्या सेटवर तुनिषा-शीजान एकत्र आले. तेव्हापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र, आत्महत्येपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता असं म्हटलं जात आहे. ब्रेकअपमुळे तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप शीजानवर करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा :

Kushboo Sundar – मी आठ वर्षाची असताना वडिलांनीच माझ्यावर…खुशबूचा खळबळजनक खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -