घरमनोरंजनअटकेचा इशारा मिळताच , कंगनाने लावली न्यायालयात हजेरी

अटकेचा इशारा मिळताच , कंगनाने लावली न्यायालयात हजेरी

Subscribe

बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौत(kangna ranaut) विरोधात गितकार जावेद अख्तर (javed akhtar)यांनी मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.(Javed Akhtar Defamation Case )यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर अनेकदा कंगना न्यायालयात हजर नसल्यामुळे शेवटी काही दिवसांपूर्वी न्यायाधीशांनी कंगनाच्या वकीलांवर संताप व्यक्त करत जर पुढील सुनावणी दरम्यान कंगना न्यायालयात उपस्थित न राहील्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याने आज अखेर कंगना  सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली आहे. गेल्या 14 सप्टेंबर रोजी कंगनाची तब्येत ठिक नसल्याचे कारण देत कंगनाच्या वकिलांनी न्यायालयाकडे काही दिवसांची मूभा मागितली होती.( Javed Akhtar Defamation Case kangna ranaut appear in court)

नेमकं काय आहे प्रकरण-

सुशांत सिंह राजूपतच्या मृत्यूनंतर कंगनाने टीव्हीवर अनेक मुलाखत दिल्या होत्या. ज्यामध्ये तिने जावेद अख्तर यांच्यावर चुकीचे आरोप केले होते. ज्यानंतर नोव्हेंबर २०२०मध्ये जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचे तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

कंगना गेल्या काही आठवड्यापासून तिच्या थलायवी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. तसेच तिला कोरोनाची काही लक्षणे आढळून आल्याने कगंनाचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यास कंगना सुनवणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा पुन्हा एकदा वकीलांतर्फे मागितली जाईल. तेव्हा कंनाचा संपूर्ण वैद्यकीय अहवाल सादर केला जाईल असे कंगनाच्या वतीने सांगण्यात आले हेते.

कंगनाने केला गुन्हा दाखल- 

तसेच दुसरीकडे कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरोधात कलम 384 अंतर्गत खंडणीची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी येत्या 1 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे कळतेय. कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 383, 384, 387, 503, 505 R/w44 आणि 33 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मात्र जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या गुन्ह्या नंतर कंगना अद्याप एकाही सुनावणीला कोर्टात हजर न राहील्याने न्यायाधीशांनाही कठोर निर्णय घेत पुढील सुनावणी साठी कंगना हजर न राहील्यास अटक वॉरंट जारी करण्यात येईल अशी सुनावणी केल्यानंतर कंगना आज न्यायालयात उपस्थित झाली आहे. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरल होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे.


हे हि वाचा – आयकर विभागाच्या सर्वेक्षणानंतर सोनू सूदने सोडले मौन म्हणाला, माझ्या संस्थेचा प्रत्येक रुपया…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -