घरमनोरंजनकंगनाने पुन्हा नेपोटिझमचा राग आळवला; बॉलीवूडला म्हटले गटार

कंगनाने पुन्हा नेपोटिझमचा राग आळवला; बॉलीवूडला म्हटले गटार

Subscribe

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून बॉलीवूडला नेपोटिझमचे ग्रहण लागले असल्याचे बोलणारी अभिनेत्री कंगना रनौत हिने पुन्हा एकदा नेपोटिझमचा राग आळवला आहे. बॉलिवूड म्हणजे ड्रग्ज, शोषण आणि नेपोटिझमचे गटार आहे, अशी टीका तिने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. नुकतेच खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससह एकूण ३८ प्रॉडक्शन हाऊसेसनी काही मीडिया हाऊसेसविरोधात दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याविरोधात प्रतिक्रिया देताना कंगनाने बॉलिवूड हे एक ड्रग्ज, शोषण आणि नेपोटिझमचे गटार असल्याचे म्हटले आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येच्या निमित्ताने हे गटार स्वच्छ होत असून या लोकांची नेमकी समस्या काय?, असाही प्रश्न तिने विचारला आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हा सगळ्यांचे पितळ उघडे पाडत राहणार, असाही इशारा कंगनाने त्यावेळी दिला आहे.

- Advertisement -

काय म्हटले आहे कंगनाने 

नाव कमावलेले अभिनेते हे तरुण मुलींचे शोषण करतात. सुशांतसारख्या अभिनेत्यांनी पुढे यावं असं त्यांना मुळीच वाटत नाही. वयाची पन्नाशी गाठली असेल तरीही सिनेमांमध्ये कॉलेज आणि शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भूमिका या बड्या अभिनेत्यांना करायच्या असतात. सिनेसृष्टीतील एक रहस्य मी आता उघड करते. तिथे असा अलिखित करार आहे की तू माझी काळी बाजू घाणेरडी बाजू लपव मी तुझी लपवेन. एकमेकांबद्दल आदर राखण्यासाठी फक्त एवढंच केलं जातं. मी लहानपणापासून हेच पाहात आले आहे की काही मूठभर लोकांच्या हातीच सिनेसृष्टीचं सूत्रं आहेत हीच माणसं सिनेसृष्टी चालवतात हे सगळं कधी बदलणार, अशी जळजळीत टीका कंगनाने केली आहे.

हेही वाचा –

TRP घोटाळ्यातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -