घरमनोरंजनकियारा-सिद्धार्थच्या लग्नविधींना सुरुवात; बँड-बाजा घेऊन वाजंत्री दाखल

कियारा-सिद्धार्थच्या लग्नविधींना सुरुवात; बँड-बाजा घेऊन वाजंत्री दाखल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या लग्नाची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. लग्नाची जोरदार तयारी केल्यानंतर अखेर आज (7 फेब्रुवारी) ही जोडी कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत शाही पद्धतीने लग्न करतील. त्यांच्या लग्नाला 100 ते 125 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये बॉलिवूडच्या काही कलाकारांच्या नावाचाही समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियाराचा मेहंदी समारंभ परवा संध्याकाळी पार पडला असून काल सकाळी त्यांचा हळदी समारंभ पार पडला. तसेच काल संध्याकाळी त्यांचे संगीत देखील झाले. आज (7 फेब्रुवारी) रोजी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

- Advertisement -

4 वाजता होणार लग्न

सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. कियारा-सिद्धार्थचं लग्न पंजाबी पद्धतीने पार पडणार आहे. आज दुपारी 3 वाजता सिद्धार्थची बँड-बाजासोबत शाही पद्धतीने वरात निघेल त्याच्या वरातील विन्टेज गाड्या, घोडे आणि ऊंट देखील असतील. वरातीची तयारी देखील आता पूर्ण झाली आहे.

- Advertisement -

घोडा देखील तयार होऊन सूर्यगढ पॅलेसमध्ये पोहोचले आहेत. त्यानंतर 4 वाजता कियारा आणि सिद्धार्थ सप्तपदी घेतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता सूर्यगढ पॅलेसमधून राजस्थानी लोकगीतांचा आवाज ऐकू येत आहे. पॅलेसबाहेर घोडा, बँड-बाजा घेऊन वाजंत्री देखील उपस्थित झाले आहेत.

गुलाबी रंगात रंगला सूर्यगड पॅलेस

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी सूर्यगड पॅलेसमध्ये सजावट करण्यात आली आहे. गुलाबी रंगात सूर्यगड पॅलेस सजवण्यात आला आहे. शिवाय फुलांनी वाड्याची सजावट करण्यात आली आहे.

 


हेही वाचा :

आज सूर्यगड पॅलेसमध्ये रंगणार कियारा सिध्दार्थचा शाही विवाहसोहळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -