घरमनोरंजनकोलकत्यामध्ये भररस्त्यात मिस इंडियाशी छेडछाड; ७ जणांना अटक

कोलकत्यामध्ये भररस्त्यात मिस इंडियाशी छेडछाड; ७ जणांना अटक

Subscribe

भररस्त्यात छेडछाड करून गाडीच्या ड्रायव्हरला बाहेर काढून केली मारहाण

कोलकत्त्यामध्ये मध्ये माजी मिस इंडिया उशोशी सेनगुप्तासोबत सोमवारी घडलेल्या घटनेमुळे तुम्हालाही या घटनेचा संताप आल्याशिवाय राहणार नाही. २०१० साली ‘मिस इंडिया’चा किताब पटकावलेल्या उशोशी सेनगुप्तासोबत भररस्त्यात छेडछाड करण्यात आली. स्वतः उशोशीने फेसबुकवर ही घटना शेअर करत त्या रात्री नेमकी काय घडलं ते सविस्तरपणे सांगितलं. उशोशी सेनगुप्ता तिचं काम संपवून कोलकत्यातील एका हॉटेलमधून बाहेर पडत आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली.

अशी घडली घटना

१७ जूनच्या रात्री पावणेबाराच्या सुमारास उशोशी जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमधून काम संपवून घरी जात असताना तिच्यासोबत तिचा सहकारीही होता. दोघांनी उबर कॅब केली होती, अर्ध्या रस्त्यात काही मुलांची टोळी बाइकवरून त्यांच्या गाडीच्या जवळ आली. त्यांनी बाइक उबर गाडीला ठोकली, त्यानंतर गाडीच्या ड्रायव्हरला बाहेर काढून मारहाण केली. याप्रकऱणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून उशोशीने तरुणांचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे.

- Advertisement -

फेसबुकवर उशोशीने लिहिली पोस्ट

ही पोस्ट सोशल मीडियावर काही क्षणार्धातच व्हायरल झाल्याने अनेकांनी राग, संताप व्यक्त केला असून घडलेल्या प्रसंगी पोलिसांनी योग्य वेळी मदत केली नसल्याची तक्रारही तिने पोस्टमध्ये केली आहे. दरम्यान, उशोशीने लिहिलेल्या पोस्टवर कोलकाता पोलिसांनी अशी माहिती दिली की, ‘या घटनेकडे आम्ही गंभीरपणे पाहात असून ७ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -