घरमनोरंजनपुन्हा एकदा कुमार सानूच्या आवाजाची जादू

पुन्हा एकदा कुमार सानूच्या आवाजाची जादू

Subscribe

कुमार सानूची गाणी आजही प्रसिद्ध आहेत. ९० च्या दशकातील गाणी आजही गुणगुणली जातात. लवकरच मेलडी किंग कुमार सानूच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. सुपरएनर्जी आणि सुपरस्टार रणवीर सिंहसाठी लवकरच कुमार सानू आपला आवाज देणार आहे. ९० च्या दशकातील सुपरहिट गाणं असून यामध्ये मेलडी आणि आजच्या स्वरुपाचं संगीत जोडून हे गाणं तयार करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या गाण्याविषयी कोणतीही अधिक माहिती देण्यास कुमार सानू यांनी नकार दिला आहे.

९० च्या दशकातील सुपरहिट गाणं

करण जोहर आणि रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात हे गाणं असून रणवीर सिंह आणि दीपिका पडुकोण यांच्यावर हे गाणं चित्रीत होणार आहे. या गाण्याबाबत जास्त काही माहिती कुमार सानूनं दिली नसली तरीही हे गाणं जबरदस्त असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर हे गाणं ड्युएट असून या गाण्यात त्यांना आताची सुपरहिट गायिका नेहा कक्कर साथ देणार आहे. मेलडी किंग कुमार सानू आणि रोमँटिक गाणं हे समीकरणच आहे. त्यामुळं हे गाणंसुद्धा रोमँटिक असेल अशी सध्या चर्चा रंगली आहे. मात्र पूर्ण माहिती हे गाणं समोर आल्यानंतरच मिळेल.

- Advertisement -

लवकरच येणार गाणं

कुमार सानू यांचं गाणं बरेच वर्ष आलं नाही. मात्र त्याच्या चाहत्यांमध्येही अजिबात कमी झालेली नाही. ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटानंतर आता रणवीर सिंहसाठी कुमार सानू गाणार आहेत. लवकरच हे गाणं प्रदर्शित होईल आणि बॉक्स ऑफिसवर धमाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -