घरमनोरंजनचाहत्यांना धूम्रपान करू नका म्हणणारी 'ही' गायिका स्वत:च ओढते ४० सिगरेट!

चाहत्यांना धूम्रपान करू नका म्हणणारी ‘ही’ गायिका स्वत:च ओढते ४० सिगरेट!

Subscribe

जगभरात अनेक सेलिब्रिटी धू्रमपान करतात पण सध्या एका सेलेब्रेटीच्या धुम्रपानाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ही सेलेब्रेटी म्हणजे लेडी गागा. ‘ऑस्कर’ आणि ‘गोल्डन’ ग्लोब सारख्या नामांकित पुरस्कार मिळालेली लेडी गागा जगातील सर्वोत्कृष्ट संगीतकांरांपैकी एक म्हणून ओळखली जाते. लेडी गागा धूम्रपानापासून लोकांना दूर नेणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेची ती ब्रँड अबेसिडर आहे. धूम्रपानापासून लोकांना दूर नेणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेची ती ब्रँड अबेसिडर आहे. या संस्थेमार्फत ती लोकांना धूम्रपान न करण्याचा सल्ला देते.

- Advertisement -

मात्र दुसरीकडे स्वत: मात्र दिवसाला सरासरी ४० सिगारेट ओढते. अलिकडेच तिने एका मुलाखतीत “मी दिवसाला तब्बल ४० सिगारेट ओढते” असे सांगितले. त्यामुळेच लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशा आशयाचे स्टेटस टाकून काही लोक सोशल मीडियाव्दारे तिच्यावर टीका देखील करत आहेत.

View this post on Instagram

Vacation Station ☀️

A post shared by Lady Gaga (@ladygaga) on

- Advertisement -

धूम्रपानामुळे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने दरवर्षी जगभरात ५५ लाख तर भारतात १० लाख नागरिकांचा मृत्यू होतो. धूम्रपान हे आरोग्यासाठी घातक आहे. धूम्रपानाचा थेट संबंध कर्करोगाशी आहे. शिवाय धूम्रपान हे उच्च रक्तदाबापासून ते ह्रदयविकाराच्या झटक्यापर्यंत विविध आजारांना कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे डॉक्टर देखील धुम्रपान न करण्याचा सल्ला देतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -