घरमनोरंजनकपिलसोबत 'लल्ली'ही परतणार ?

कपिलसोबत ‘लल्ली’ही परतणार ?

Subscribe

कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा सोनीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. २९ डिसेंबर रोजी हा शो सुरु होणार असून कपिलच्या फॅन्समध्ये देखील त्याच्या कमबॅकची उत्सुकता वाढली.

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती कपिल शर्माची… कारण कपिल शर्मा एका मोठ्या ब्रेकनंतर कमबॅक करत आहे. पण त्यांच्यासोबत सगळ्यांची लाडकी लल्लीही येणार आहे असं कळत आहे. आता लल्ली म्हणजे तीच गुटगुटीत मुलगी म्हणजेच ती भूमिका साकारणारी भारती सिंह ९ महिन्यांच्या ब्रेकनंतर तिच्या विनोदी अवतारात परतणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार आहे.

येतोय कपिल शर्माचा नवा शो,पाहा झलक

भारती साकारणार ही भूमिका

भारती या शोमध्ये किकू शारदाच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तितली यादव असे या भूमिकेचे नाव असणार आहे. ज्यांना तब्बल ११ मुले असणार आहेत, असे कळत आहे. भारतीने दिलेल्या एका मुलाखतीत कपिल शर्माची तुमच्या पेक्षा मीच जास्त वाट पाहत आहे असे म्हटले. जेव्हा कपिलचा शो बंद झाला तेव्हाच त्याला मी तुझ्या पाठिशी आहे असे म्हटले होते. तेव्हा त्याला म्हटले होते जेव्हा परतशील तेव्हा तुझ्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. असे भारतीने त्याला सांगून टाकले. त्यामुळे आता भारती कपिलसोबत हास्याचे फवारे उडवणार यात काही शंकाच नाही.

- Advertisement -
सलमान खानची कपिल शर्मावर कृपा

२९ डिसेंबर रोजी येणार शो

कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा सोनीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. २९ डिसेंबर रोजी हा शो सुरु होणार असून कपिलच्या फॅन्समध्ये देखील त्याच्या कमबॅकची उत्सुकता वाढली. सध्या भारती इंडियाज गॉट टॅलेंट या रिअॅलिटी शोचे अॅकरींग करत आहे. आता २९ डिसेंबर पर्यंत कपिल शर्माच्या नव्या अवताराची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -