घरताज्या घडामोडीलावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत केला प्रवेश

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत केला प्रवेश

Subscribe

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राजकारणातील प्रवासाला आजपासून सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सुरेखा पुणेकरांसह देवयानी बंद्रे यांनी देखील राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधलं आहे. काही दिवसांपूर्वी सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः दिली होती.

आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष असल्याची टीका केली. यानंतर प्रविण दरेकरांवर अनेकांनी निशाणा साधला. सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पुन्हा दरेकरांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, ‘दरेकरांचं फार चुकलं. तुम्ही महिलांना संरक्षण, मान देऊ शकत नाही. तर निदान बोलू तरी नका ना. तुम्हाला महिलांविषयी बोलायचा काही अधिकार नाही. तुम्ही पुरुषांविषयी बोला, पण महिलांविषयी बोलू नका. आज जर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला पेटल्या तर काय होईल, म्हणून अशी विधान कुठे करू नका. एवढा मोठा पक्ष आहे आणि एवढ्या मोठ्या पक्षातील माणूस असा बोलतं असेल तर अख्ख्या महाराष्ट्रातील महिलांवर काय परिणाम होतो आणि काय झालायं.’

- Advertisement -

म्हणून सुरेखा पुणेकरांनी राजकारणात केला प्रवेश

सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी म्हणाल्या होत्या की, ‘मी आतापर्यंत कलेची सेवा केली. आता मला राजकारणात प्रवेश करून जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे, गोरगरीबांचे प्रश्न सोडवायचे आहेत.’ त्यामुळे आज सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.


हेही वाचा – Bigg Boss Ott मध्ये अभिनेता करण कुंद्राची होणार एंट्री

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -