Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Bigg Boss Ott मध्ये अभिनेता करण कुंद्राची होणार एंट्री

Bigg Boss Ott मध्ये अभिनेता करण कुंद्राची होणार एंट्री

करण बऱ्याच काळापासून गर्लफ्रेंड अनुशासोबत ब्रेकअप केल्यामुळे चर्चेत आला होता

Related Story

- Advertisement -

बिग बॉस ओटीटी 15 (Bigg Boss OTT)या सिझनची तुफान चर्चा सगळीकडे रंगत आहे. आता काही दिवसातच टीव्हीवर सलमान खान(Salmaan Khan) शो होस्ट करताना दिसणार आहे. त्याचबरोबर, शोमध्ये आणखी कोणत्या स्पर्धकाची एंट्री होणार आहे कोणते ट्विट्स अँन्ड टर्न पाहायला मिळणार आहेत याची उत्सुकतचा प्रत्येक बिग बॉसच्या चाहत्याला लागून राहीली आहे. बिग बॉस ओटीटी बाबत दररोज सोशल मीडियावर काहीना काही गॉसिप्स रंगत असताता त्याचबरोबर, आता अभिनेता करण कुंद्रा(karan kundrra) बिग बॉस 15 मध्ये एंट्री करणार आहे अशी बातमी व्हायरल होत आहे. माहितीनुसार करण लवकरच सलमान खानसह बिग बॉस मध्ये झळकणार असल्याचे कळतेय.( actor Karan Kundrra will be a part of the show of bigg boss)

अलीकडे करण कुंद्रा टीव्ही सीरियल ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये दिसला होता. करणने आपल्या करिअरची सुरुवात ‘कितनी मोहब्बत है’ पासून केली. त्यानंतर त्याला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. एवढेच नाही तर करण गुमराह या शोचा होस्टही राहिला आहे.त्याचबरोबर, करणने त्याची पूर्व प्रेयसी अनुषा दांडेकरसोबत एमटीव्हीच्या कपल रिअॅलिटी शो लव स्कूलचे अनेक सीझन होस्ट केले आहेत. रोडीजमध्ये करण गँग लीडरच्या भूमिकेतही दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

- Advertisement -

करण बऱ्याच काळापासून गर्लफ्रेंड अनुशासोबत ब्रेकअप केल्यामुळे चर्चेत आला होता आणि बिग बॉसच्या घरात दाखल होत असल्याने पुन्हा एकदा करणची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.यावेळी बिग बॉस शोची थीम थोडी वेगळी असणार आहे. शोच्या प्रोमो व्हिडिओमधून दिसून येत आहे की यंदा शोची थीम जंगलावर आधारित असणार आहे.


- Advertisement -

हे हि वाचा –  जेनेलियाचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीला

- Advertisement -