घरमनोरंजनविजय सेतुपतिच्या ‘गांधी टॉक्स'मध्ये मराठमोळा सिद्दार्थ जाधव झळकणार

विजय सेतुपतिच्या ‘गांधी टॉक्स’मध्ये मराठमोळा सिद्दार्थ जाधव झळकणार

Subscribe

2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. याचं निमित्ताने ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. किशोर पी बेलेकर दिग्दर्शित ‘गांधी टॉक्स’ चित्रपटामध्ये विजय सेतुपति, अरविंद स्वामी आणि आदिती राव हे कलाकार असणार आहेत. तसेच या चित्रपटामध्ये मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव सुद्धा झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

दरम्यान, सिद्धार्थ जाधवने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘गांधी टॉक्स’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टखाली त्याने लिहिलंय की “मी फार उत्सूक आहे…माझा पुढील चित्रपट. पुन्हा एकदा मुकपटांचा काळ जगूया.”

- Advertisement -

या चित्रपटाच्या टीझरमधून लक्षात येतंय की, हा चित्रपट विनोदी असणार आहे. तसेच या चित्रपटाचे नाव जरी ‘गांधी टॉक्स’ असलं तरी हा चित्रपट एक मुकपट असणार आहे. म्हणजेच या चित्रपटामध्ये कोणताही कलाकार काहीही बोलणार नाही. फक्त हावभावातून अभिनय केला जाईल.

‘गांधी टॉक्स’ चित्रपट तेलुगू, तमिळ, मराठी, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर बेलेकर यांनी केले असून या चित्रपटात विजय सेतूपती, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी, सिद्धार्थ जाधव हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

सुशांत सिंह राजपूतसोबत जे झालं ते माझ्यासोबतसुद्धा होईल…, कमाल आर खानची पोस्ट चर्चेत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -