घरमनोरंजनखतरनाक! तीन दाक्षिणात्य भाषेत 'मुळशी पॅटर्न'चा रिमेक

खतरनाक! तीन दाक्षिणात्य भाषेत ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक

Subscribe

तीन दक्षिणात्य भाषांमध्ये 'मुळशी पॅटर्न' प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटांच्या लेखन, दिग्दर्शनाची धुरा प्रवीण तरडे स्वतः सांभाळणार

मुळशी पॅटर्न हा चित्रपट २०१८ साली प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. अभिनेता-लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा हिंदी रिमेक येण्याची घोषणा देखील झाली होती. ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या हिंदीतील ‘मुळशी पॅटर्न’मध्ये अभिनेता आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच आता ‘मुळशी पॅटर्न’ आणखी तीन दाक्षिणात्य भाषांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. तीन दक्षिणात्य भाषांमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटांच्या लेखन, दिग्दर्शनाची धुरा प्रवीण तरडे स्वतः सांभाळणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटांबद्दल प्रवीण तरडे यांनी असे सांगितले की, ‘तेलुगु, तमिळ आणि कन्नड या तीन दक्षिण भारतीय भाषांमध्ये या चित्रपटाचा पुनर्निर्मिती होत आहे. अभिनेता देव गिलसह मी या प्रोजेक्टवर काम करत आहे. मी हिंदी आवृत्तीशी संबंधित नसलो तरी दक्षिण आवृत्त्यांमध्ये दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय करणार आहे.’ तसेच या चित्रपटाचा दक्षिणात्य लोकांचा कसा संबंध असेल यावर बोलताना त्यांनी असे सांगितले की, ‘पुण्यातील मुळशीप्रमाणेच बेंगळुरू आणि चेन्नई येथील शेतकऱ्यांचीही परिस्थिती तशीच आहे. जिथे पूर्वी शेती होती, तिथे आता आयटी पार्क आणि उद्योग सुरू झाले आहेत. हा विषय संपूर्ण देशाशी संबंधित आहे.’

या रिमेकमध्ये प्रेक्षकांना बहुतेक मराठी कालाकार बघायला मिळणार आहे, तर स्वतःदेखील या चित्रपटात एका इन्स्पेक्टरची भूमिका साकारणार असून यामध्ये मुख्य कलाकाराच्या भूमिकेत मात्र दक्षिणात्य कलाकार दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले.


रिंकूचा ‘अनपॉज्ड’ प्रेक्षकांच्या भेटीला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -