घरक्राइमधक्कादायक: नवरा चक्क बायकोच्या मृतदेहाशेजारी बसून खेळत होता गेम!

धक्कादायक: नवरा चक्क बायकोच्या मृतदेहाशेजारी बसून खेळत होता गेम!

Subscribe

बायकोच्या माहेरीही त्याने फोन करून 'मी तुमच्या मुलीला मारून टाकले आहे',असे सांगितले. पोलीस येईपर्यत आरोपी नवरा बायकोच्या मृतदेहाशेजारी बसून मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळत होता.

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्यरात्री अचानक उठून नवऱ्याने आपल्या बायकोची कैची खोपसून हत्या केली. हत्या करून तो बायकोच्या मृतदेहाजवळ बसून मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळत बसला होता. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. जोधपूरच्या महामंदिर पोलीस स्टेशनच्या बीजेएस कॉलनीमध्ये रविवारीही घटना घडली.

रविवारी रात्री नवऱ्याने आपल्या बायोकीची राहत्या घरी हत्या केली. बायोकची हत्या केल्या नंतर नवऱ्याने पोलिसांना फोन करून मी बायकोची हत्या केली असे सांगितले. त्याचप्रमाणे बायकोच्या माहेरीही त्याने फोन करून ‘मी तुमच्या मुलीला मारून टाकले आहे’,असे सांगितले. पोलीस येईपर्यत आरोपी नवरा बायकोच्या मृतदेहाशेजारी बसून मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळत होता.

- Advertisement -

पोलीस घटनास्थळी पोहचताच आरोपी नवरा हा बायकोच्या मृतदेहाशेजारी बसून गेम खेळताना दिसला. हा प्रसंग पाहून पोलिसही अवाक झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रसिंहने त्याची बायको शिव कंवर हिची कैचीने मारून हत्या केली. विक्रमला सकाळपर्यत आपण आपल्या बायकोची हत्या केली असल्याचे माहिती नव्हते. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आपण खूप मोठा गुन्हा केल्याचे आरोपीच्या लक्षात आले.

विक्रम आणि शिव कंवर यांना दोन मुले आहेत. आरोपी विक्रमसिंह या खूप दिवसांपासून बेरोजगार होता. त्याची बायको शिलाईचे काम करून घर चालवत होती. काही दिवसांपूर्वी त्याची बायको एका सहकारी दुकानात कामाला लागली होती. ते त्याला आवडले नव्हते.
पीडित महिलेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, २००८ साली शिव कंवर आणि विक्रमसिंह यांचे लग्न झाले होते. बहिणीची नवरा बेरोजगार होता. बहिण त्यांचे घर चालवत होती. त्यांची मुलगी भावाकडे आणि मुलगा आजोबांकडे राहायला होता, असे त्याने सांगितले.

- Advertisement -

विक्रमसिंह यांच्या घरची परिस्थिती पाहून पोलिसही गडबडून गेले होते. पोलिसांनी पीडित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


हेही वाचा – धक्कादायक; वाढदिवसाचे आमंत्रण देऊन मित्राने केला तिच्यासमोर नग्न डान्स!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -