घरताज्या घडामोडीमराठी इतिहासातील योद्ध्याचे आयुष्य उलघडणाऱ्या 'रावरंभा' च्या चित्रीकरणाला सुरुवात

मराठी इतिहासातील योद्ध्याचे आयुष्य उलघडणाऱ्या ‘रावरंभा’ च्या चित्रीकरणाला सुरुवात

Subscribe

अनेकदा आपल्याला इतिहास वाचताना किंवा चित्रपटातून मोजक्याच इतिहासकारांची माहीती मिळते. मात्र, इतर इतिहासकारांच्या कहाण्यांपासून आपण अलिप्त राहत असतो. मात्र,'रावरंभा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी इतिहासातील योद्ध्याचे आयुष्य उलघडणार आहे. दरम्यान, दिग्दर्शक संजय जाधव हे पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचे छायांकन करणार आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे याने दिग्दर्शित केला असून, कर्जतमधील एनडी स्टूडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात इतिहास घडवणाऱ्या शूरवीरांच्या कामगिरीवर अनेक चित्रपट चित्रीत करण्यात आले आहेत. मात्र इतिहासात अनेक असे योद्धा होऊन गेले आहेत. ज्यांची महती अनेकांपर्यंत पोहोचली नाही. आपल्या इतिहासातील प्रत्येक घटना या आपल्यासाठी अभिमानास्पद असून, या शूरवीरांचे व्यक्तीमत्त्व युवापिढीसाठी प्रेरणादायी ठरते आहे. अनेकदा आपल्याला इतिहास वाचताना किंवा चित्रपटातून मोजक्याच इतिहासकारांची माहीती मिळते. मात्र, इतर इतिहासकारांच्या कहाण्यांपासून आपण अलिप्त राहत असतो. मात्र,’रावरंभा’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी इतिहासातील योद्ध्याचे आयुष्य उलघडणार आहे. दरम्यान, दिग्दर्शक संजय जाधव हे पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचे छायांकन करणार आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे याने दिग्दर्शित केला असून, कर्जतमधील एनडी स्टूडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anup Jagdale (@anupjagdale_official)

- Advertisement -

शशिकांत पवार प्रोडक्शनचे शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी ‘रावरंभा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे लेखन हे ऐतिहासिक कथानक मांडण्यात तरबेज असणाऱ्या प्रताप गंगावणे यांनी केले आहे.या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हा चित्रपट मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या सातारा या जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच ‘रावरंभा’ या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला मावळा या पोस्टरवर दिसत असून अतिशय लक्षवेधी असे हे पोस्टर आहे. त्यामुळे आकर्षक नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Birju Maharaj Passes Away: बिरजू महाराजांच्या जाण्याने कमल हसन भावूक


 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -