घरमनोरंजन'चोरीचा मामला' : अमृताच्या ग्लॅमरस अदा आणि जितू भाऊचा चोरीचा इरादा

‘चोरीचा मामला’ : अमृताच्या ग्लॅमरस अदा आणि जितू भाऊचा चोरीचा इरादा

Subscribe

अभिनेता जितेंद्र जोशी आणि अमृता खानविलकर यांचा ‘चोरीचा महिला’ हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा टीझर बघितल्यावर ‘चोरीचा मामला’ या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा देखील तितकीच भन्नाट आणि विनोदी असेल, असे लक्षात येते. या चित्रपटाचा टीझर बघितल्यावर आपसूकच चित्रपट पाहण्याची इच्छा बळकावेल, इतका विनोदी तो टीझर आहे.

- Advertisement -

चोरीचा मामला चित्रपटात अमृता खानविलकर ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे. ती या चित्रपटात श्रद्धा नावाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता जितेंद्र जोशी नंदन नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमातील हा नंदन चोर आहे आणि तो श्रद्धाच्या घरी चोरी करायला जातो. नंदन जेव्हा चोरी करण्यासाठी श्रद्धाच्या घरी पोहोचतो तेव्हा प्रचंड विनोदी घडामोडी घडताना प्रेषकांना दिसणार आहेत. सध्या या चित्रपटातील दोन मुख्य पात्रांचे वेगवेगळे टीझर प्रदर्शित झाले आहेत. हे टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अभिनेता प्रियदर्शन जाधव ‘मस्का’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक म्हणून ‘चोरीचा मामला’ हा त्याचा दुसरा सिनेमा आहे. विशेष म्हणजे प्रियदर्शननेच या सिनेमाचे लेखन देखील केले आहे. चिनार-महेश यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. तर एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओज निर्मित सुधाकर ओमळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -