घरमनोरंजनपार्टी पुरेशी रंगत नाही

पार्टी पुरेशी रंगत नाही

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री, मित्रांबरोबर केलेली मजा, दारू पार्ट्या या विषयावर आधारीत अनेक चित्रपट आले. या चित्रपटांच्या गर्दीत आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. ‘आयुष्य म्हणजे एक पार्टी आहे आणि त्याचा प्रत्येक क्षण आनंदाने घ्यायचा’ असं म्हणतं पार्टीची सुरुवात होते.

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री, मित्रांबरोबर केलेली मजा, दारू पार्ट्या या विषयावर आधारीत अनेक चित्रपट आले. या चित्रपटांच्या गर्दीत आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. ‘आयुष्य म्हणजे एक पार्टी आहे आणि त्याचा प्रत्येक क्षण आनंदाने घ्यायचा’ असं म्हणतं पार्टीची सुरुवात होते. पण पार्टी म्हणावी तशी रंगत नाही. सुरुवातीला दणक्यात सुरू झालेली पार्टी काहीवेळानंतर मात्र कंटाळवाणी होते. या पार्टीत आपण का आलो असाही विचारही मनात येतो. खरंतर विषय जूनाच असला तरी तो मैत्रीचे वेगवेगळे किस्से घेऊन आणखी रंगवता आला असता.

ओमकार (सुव्रत जोशी), सुमीत (स्तवन शिंदे),चकर्‍या (अक्षय टांकसाळे),मनोज (रोहित हळदीकर) अशी ही चौघांची कट्टा गँग. इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही यातील तीन मित्र गरीब आणि एक श्रीमंत. त्याचप्रमाणे ओमकार हा त्यांच्यात श्रीमंत असतो आणि बाकी तिघांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही बेताची असते. पण असे असले तरीही या चौघेही पैसा कमवणे, सेटल होणं याचा विचारही कधी करत नाहीत. आपण,आपले मित्र आणि दारू एवढाच विचार त्यांच्या मनात असतो. सुमीतच्या आयुष्यात अनेक मुली येतात पण तो कधीच त्यांच्याकडे गांभीर्याने बघत नाही. याउलट ओमकार आणि चकर्‍या हे मात्र प्रेमाच्याबाबतीत सिरीयस होतात. ओमकारच्या आयुष्यात अपर्णा(प्राजक्ता माळी) आणि चकर्‍याच्या आयुष्यात दिपाली (मंजिरी पुपाला) येतात. अशी सगळी आयुष्यात मज्जा सुरू असताना आयुष्यात पुढे काही कारणांनी हे मित्र एकमेकांपासून दूर जातात आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो. यावर हा चित्रपट आधारीत आहे. दिग्दर्शक सचिन दरेकर यांचा हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटात पुढे काय होणार याची फारशी उत्सुकता लागत नाही. संपूर्ण चित्रपट हा फ्लॅशबॅकमध्ये सुरू असतो. 18 वर्षापूर्वी या चौघांच्या आयुष्यात काय घडलं हे सगळं म्हणजे पार्टी हा चित्रपट. पण फ्लॅशबॅक चित्रपटात यशस्वी ठरत नाही. 18 वर्षापूर्वीचा काळ तुमच्यासमोर उभाच रहात नाही. चित्रपट वर्तमानात काळातच सुरू असल्यासारखा वाटत राहतो. थोडक्यात चित्रपटात फ्लॅशबॅक फसला आहे.

- Advertisement -

इतर विनोदी, मसाला चित्रपटांप्रमाणे याही चित्रपटात नाच गाणी आहेत. पण ही गाणी लक्षात रहात नाही. हळदीचं ‘भावड्या भावड्या’ गाणं असो वा बारमधलं गाणं कोणत्याच गाण्यावर ठेका धरावसा वाटत नाही. त्याचप्रमाणे अनेक प्रसंगात तोच तोचपणा आढळतो. सतत या चौघांच दारू पिणं, समोरच्याला फसवून पैसा गोळा करणं या प्रसंगाचा चित्रपटात भरणा आहे. चित्रपटातील काही विनोदी प्रसंग सोडता चित्रपट पकड घेत नाही. दोन तास प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवण्यासाठी केवळ दारू आणि विनोद पुरेसे पडत नाहीत, तर यासाठी सक्षम कथा असायला लागते. सक्षम कथच चित्रपटात नसल्यामुळे कंटाळवाणा होतो. मात्र ओमकार,चकर्‍या, सुमित, मनोज या चौघांची भट्टी जमून आलेली आहे. त्याचप्रामाणे प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या दोघींनीही आपली काम चोख पार पाडली आहेत. या सगळ्यांचा अभिनय हीच काय ती चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटातील पात्रांची पूर्ण ओळख तुम्हाला चित्रपटात होत नाही. चित्रपट संपला तरी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. अचानक स्टार क्रिकेटर झालेल्या सुमीतला कोणीच कसं ओळखत नाही. यासारखे अनेक प्रश्न तुम्हाला सतवतात. शेवटही फार ताणल्या सारखा वाटतो. त्यामुळे या पार्टीत सहभागी होण्यापेक्षा आपल्या मैत्रांबरोबर एखादी पार्टी करायला काहीच हरकत नाही.

संचिता ठोसर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -