घरताज्या घडामोडीVideo: मला अटक झालेली नाही - पूनम पांडे

Video: मला अटक झालेली नाही – पूनम पांडे

Subscribe

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनचे पालन सर्व सेलिब्रिटी करत आहेत. सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांना देखील लॉकडाऊनचे पालन करण्यास सांगत आहेत. पण लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यामुळे मॉडेल आणि बोल्ड बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेला अटक करण्यात आली होती.

आता पूनम पांडेने अटक वगैरे झालेली नसल्याचं सांगितलं आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिने स्षष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली की, मी रात्री एकापाठोपाठ तीन चित्रपट पाहिले. मला खूप मज्जा आली. मग काल रात्रीपासून मला अटक झाली आहे असे फोन येते होते आणि बातम्या देखील पाहिल्या. मित्रांनो, माझ्याबद्दल असे काही लिहू नका. मी घरी सुरक्षित आहे, असं तिने या व्हिडिओ म्हटलं आहे.

- Advertisement -

यापूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्यूंजय हिरेमठ यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं होत की, पूनम पांडे (वय २९) आणि सॅम अहमद बॉम्बे (वय ४६) यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या ५१ बी, २६९ आणि १८८ या कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पूनम पांडे आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ कारमधून विनाकारण मित्रासोबत भटकंती करत होती. दरम्यान, तिला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी विचारणा केली असता, ती विनाकारण भटकंती करत असल्याचे समोर आले. त्यामुळे तिची ‘बीएमडब्ल्यू’ कार पोलिसांनी जप्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: अमेरिकन लोकांच्या मृत्यूला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार – नोम चॉम्स्की


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -