घरमनोरंजनVideo: नरगीस फाकरीची भयानक 'अमावस'

Video: नरगीस फाकरीची भयानक ‘अमावस’

Subscribe

११ जानेवारी २०१९ रोजी 'अमावस' हा भयपटप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री नरगीस फाकरी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी तयार आहे. ‘ढिशूम’, ‘हाऊसफुल ३’ अशा चित्रपटांमधून आपल्या हॉटनेसने सर्वांनाच घायाळ करणारी नरगीस आता प्रेक्षकांना घाबरवायला येत आहे. दिग्दर्शक भूषण पटेल यांचा ‘अमावस’ हा नवीन भयपट लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. नरगीस फाकरी यामध्ये प्रमुख भूमिकेत असून, नुकताच या चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीझर रिलीज झाला आहे. ‘अमावस’ चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल यांनी याआधी ‘रागिनी एमएमएस २’, ‘अलोन’ आणि ‘१९२० एविल रिटर्न्स’ यांसारख्या भयपटांची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वीच हॅलोविनला अमावस चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. चित्रपटाच्या गूढ पोस्टरमुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर आता ‘अमावस’चा टिझर रिलीज झाला असून, त्याला सोशल मीडियावर लोकांची पसंती मिळते आहे. ‘अमावस’ चित्रपटात नरगिस फाख्री, सचिन जोशी, विवान भटेना, नवनीत कौर ढिल्लन, मोना सिंग आणि अली असगर आदी कलाकार भूमिका साकारणार आहेत. सध्या इंटरनेटवर चित्रपटाचा टिझर व्हायरल होत असून, टिझरमधील काही दृष्य थरकाप उडावणारी असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या आहेत. ‘अमावस’ या भयपटाचं संपूर्ण शूटिंग लंडनमध्ये ४० दिवसांत पार पडलं.

 

- Advertisement -

प्रेक्षक खरंच घाबरणार ?

‘इसबार भी वो अंधेरा छाएगा अपनी पुरी ताकदों के साथ,’ अशाप्रकारचे डायलॉग्ज टीझरमध्ये ऐकायला मिळतात. प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार, ‘अमावस’ चित्रपटाचा टिझर भितीदायक असला तरी प्रत्यक्षात तो प्रेक्षकांना घाबरवण्यास किती यशस्वी ठरतो हे येणारी वेळच सांगेल. कारण याआधीही बॉलीवूडध्ये असे अनेक भयपट आले आहेत ज्यांचे ट्रेलर वा टिझर दमदार होते. मात्र, संपूर्ण चित्रपट पाहायला गेल्यानंतर प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली होती. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘रागिनी एमएमएस २’ आणि ‘अलोन’ या चित्रपटांचे देता येईल. हे दोनही भयपट बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकले नव्हते. या पार्श्वभूमीवर आता अमावस चित्रपट काय कमाल दाखवतो, हे येणारी वेळच सांगेल. ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक तरूण आदर्श यांनी ‘अमावस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -