घरताज्या घडामोडी...यामुळे अनुष्का शर्माची 'पाताल लोक' वेबसिरीज ट्विटरवर आली ट्रेंडमध्ये!

…यामुळे अनुष्का शर्माची ‘पाताल लोक’ वेबसिरीज ट्विटरवर आली ट्रेंडमध्ये!

Subscribe

अनुष्का शर्माची वेबसिरीज प्रदर्शित झाल्यामुळे वादातच्या भोवऱ्यात अडकली.

सध्या कोरोना व्हायरस, प्रवासी मजूर आणि चीन-नेपाळमधील मतभेद यासारख्या विषयांबद्दल चर्चा सुरू आहे. परंतु आज ट्विटरवर या वेगळ्या विषय ट्रेंडिंगवर आहे. #BoycottPaatalLok आणि #CensorWebSeries हे हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. असे काय झाले की नेटकरी या विषयावर इतके बोलू लागले? तर हेच आपण जाणून घेऊया.

- Advertisement -

बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्माने अॅमेझॉन प्राईमच्या माध्यमातून वेब सिरीजच्या दुनियेत निर्माती म्हणून पदार्पण केले. नुकतीच प्रदर्शित झालेली नीरज कबी, जयदीप अहलावत आणि गुल पनाग यांच्या या वेबसिरीजला अनेक आरोपाला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर ही वेबसिरीज एका विशिष्ट धर्माच्या विरुद्ध तयार केली आहे, असा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. तसेच ही वेबसिरीज हिंसा आणि जातीवादाला प्रोत्साहित करते असा देखील आरोप केला आहे. प्रदर्शित झालेल्या दिवसापासून ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरीजमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे नेटकरी सांगत आहे. त्यामुळे ट्विटरवर सध्या #BoycottPaatalLok हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे.

- Advertisement -

#CensorWebSeries या हॅशटॅगच्या माध्यमातून ‘पाताल लोक’ या वेबसिरीजला सेन्सॉरशिप लावण्याची मागणी नेटकरी करत आहेत. बऱ्याच जणांना माहित असेल की, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डकडे जावे लागते. परंतु वेबसिरीजला हा नियम नाही आहे. ‘पाताल लोक’ या वेबसिरीज चर्चेत आल्यानंतर आता लोक इतर वेबसिरीजवर देखील सेन्सॉरशिप लावण्याची मागणी केली जात आहे. यामध्ये ‘द फॅमिली मॅन’, ‘कोड एम’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘लैला’ आणि बर्‍याच वेब सिरीजचा समावेश आहे. त्यामुळे सध्या नेटकरी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना ट्विट टॅग करून वेब सीरिजसाठी सेन्सॉरशिप लावण्याची मागणीही करीत आहेत.


हेही वाचा – बिहारमध्ये सोनू सूदचा पुतळा उभारण्याची तयार सुरू; हे समजताच तो म्हणाला…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -