घरमनोरंजनएक ‘ओला-ओला फार्स’ ... घरात मॅरीड बाहेर बॅचलर

एक ‘ओला-ओला फार्स’ … घरात मॅरीड बाहेर बॅचलर

Subscribe

ओला कॅबमुळे घडणारं घरात मॅरीड बाहेर बॅचलर हे फार्सीकल (विनोदी) नाटक आहे. नाटककार सुरेश जयराम हे ज्येष्ठ, अनुभवी लेखक. ते फार्समध्ये सर्व शक्यता निर्माण करत जातात. त्यामुळे चांगल्या दिग्दर्शकासाठी आवश्यक रसायन उपलब्ध होते.

ओला कॅबमुळे घडणारं घरात मॅरीड बाहेर बॅचलर हे फार्सीकल (विनोदी) नाटक आहे. नाटककार सुरेश जयराम हे ज्येष्ठ, अनुभवी लेखक. ते फार्समध्ये सर्व शक्यता निर्माण करत जातात. त्यामुळे चांगल्या दिग्दर्शकासाठी आवश्यक रसायन उपलब्ध होते. विजय केंकरे हे फार्समध्ये असे रसायन मिळाल्यावर त्याचे उत्कृष्ट ब्लेंडिंग करण्यात वाकब्गार आहेत. इथे त्यांनी सर्व घटना आणि प्रसंग शक्यतेच्या पलीकडे जाऊनही प्रेक्षकांचा हात सोडणार नाहीत याची काळजी घेतली आहे.हल्ली बेस्टने प्रवास करण्यात दम उरला नाय.
बाजूच्या सीट वरून ढेल्या सांगत होता. ढेल्या एकाच वेळी समाजशास्त्रज्ञ आणि नाट्यतज्ज्ञ आहे- तसा तो कोणत्याही भूमिकेत तज्ज्ञच असतो.
असं का! का असं? मी उगीचच.
अरे, हल्ली लेडीज बायकांना रिझर्व्ह शीटा ठेवल्या ना! आता शेजारी बाई भेटायचा चान्स फक्त शेयर रिक्षा आणि ओला, उबर. लफडीच नायत!
ओला कॅबमुळे घडणारं फार्सीकल नाटक समोर सुरू होत होतं.
कमालीची तर्कट पात्रे,अ-तार्किक प्रसंग मालिकेत स्वत: ला विश्वासपूर्वक झोकून देतात, तेव्हा चांगला फार्स तयार होतो. अतिशयोक्ती हा फार्सचा प्राण आहे. तो घडवायला सोपा नाही. दमछाक करणारा आहे. इथे लेखक- दिग्दर्शक आणि कलाकारांचे रसायन बाटलीत नीट मुरायला लागते.
मी ढेल्याला फार्सची तत्त्वे सांगत होतो.
बरोबर. बाटली, म्हणजे बार- हा फार्सचा अविभाज्य घटक आहे. ढेल्याने माझे ज्ञान वाढवले.

पडदा उघडताच समोर राजन भिसेंनी डिझाइन केलेल्या सुंदर बंगल्यामध्ये तोच अविभाज्य घटकसमोर दिसला. नाटकाचे थीम कम शीर्षक गीत इतके गोड होते की, ढेल्या नंतर नाटकभर ते गुणगुणत होता. बार समोर एकनाथ आपल्या मित्राची वाट पाहात उभा आहे. तो आनंदचा मारुती, खास मदतीसाठी तिथे आलाय. आपल्या मित्राने कोणते नवे लफडे करून ठेवले आहे याचा तो अंदाज घेतोय. या घरात एक प्रचंड उत्साही कामवाली बाई गंगी आहे. गाणे आणि त्यावर डान्स करतच ती घरात वावरते. ओला कॅबमध्ये लफडी करण्यात वाकबगार झालेल्या आनंदचे एक लफडे, त्याच्या घरा शेजारी येऊन ठेपले आहे. शेजारचे रो हाऊस तिला मैत्रिणीने रहायला दिले आहे. तिथे नेण्यासाठी घरातल्या चेयर्स, सोफा वगैरे हलवायला नाथा आणि आनंद लागतात आणि आनंदची बायको शैला येते.

- Advertisement -

शैला एका पेंटिंग क्लासला जाते आणि घरात अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज बनवते. आता आनंदचे ओला प्रकरण अमृता त्याला शोधत तिथे येते. नाथाला ती शैलाचा नवरा समजते.दोघी एकमेकांसमोर येऊनही आनंद वाचतो.त्यातून उसंत घेतोय तोच एक फायर ब्रिगेड ऑफिसर, संपूर्ण गणवेशात तिथे अवतरतो. त्याला खुर्ची ऐवजी ठेवलेल्या घोड्यावर बसवतात. असे अचानक येणारे टॉस्डअप कॅरेक्टर ही फार्सची आणखी एक खासियत. त्याने पुरेसा गोंधळ उडल्यावर कळते की तो अमृताचा बाप आहे. इथवर शैलाने अमृताला सहपरिवार जेवणाचे आमंत्रण दिलेले आहे. आता आनंदला दोन ताटांवर बसायची वेळ येते. ती चुकवायचा प्रयत्न होतो. यात सगळी टेंशन्स नाथा पेग्ज पीत घेतो. जेवणाच्या एक्स्ट्रा ताटावर अमृताच्या बापाला बसवायचे ठरते. आणि…. आनंदचे नवे प्रकरण मंदा स्टेजवर येते! ही टेंशन आलं की पिते. काही वेळात टाईट होते. तिला नाथावर सोडतात. कथानक आता कमालीचा वेग घेते. आनंद पकडला जातोय असे वाटत असताना आणखी एक नवे पात्र भूषण तिथे येतो. तो शैलाचा पेंटिंग क्लासमधला मित्र आहे. आता शैलाची तारांबळ उडते. पुढे जो गोंधळ हे सारे मिळून घालतात तो प्रत्यक्ष अनुभवण्यातच मजा आहे.

नाटककार सुरेश जयराम हे ज्येष्ठ, अनुभवी लेखक. ते फार्समध्ये सर्व शक्यता निर्माण करत जातात. त्यामुळे चांगल्या दिग्दर्शकासाठी आवश्यक रसायन उपलब्ध होते. विजय केंकरे हे फार्समध्ये असे रसायन मिळाल्यावर त्याचे उत्कृष्ट ब्लेंडिंग करण्यात वाकब्गार आहेत. इथे त्यांनी सर्व घटना आणि प्रसंग शक्यतेच्या पलीकडे जाऊनही प्रेक्षकांचा हात सोडणार नाहीत याची काळजी घेतली आहे.
संजय नार्वेकर आनंदच्या भूमिकेत त्यांच्या नेहमीच्या सहजतेने वावरतात. त्यांचे स्वत:शी आतल्या आवाजात बोलणे, भिंतीवर अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग बनणे, मी सांगू की तू सांगतोस? या लकबी खासच हशे वसूल करतात. त्यांना इथे मोलाची साथ दिली आहे नाथा झालेल्या हेमंत ढोमे यांनी. त्यांनी नाथा हे अर्कचित्र न करता, त्याला खूपच वास्तव पातळीवर ठेवला आहे. त्यातूनही ते निव्वळ टायमिंगने पंचेस वर्क करतात. दोघं एकत्र मिळून, जेवायला सहा की सात जण आहेत? हा गोंधळ मस्त घालतात. एका पंच मधून इजा-बिजा- तिजा पद्धतीने लाफ्टर्स मिळवतात. शर्वरी लोहकरे यांनी शैला ही फार्सीकल व्हेन पकडून पण अर्कचित्र न होऊ देता उभी केलीय. त्यांची शैला इतकी ठोस आणि फ्रेश वाटत राहते की बस!
ऋतुजा धारप आणि मोहिनी पोतदार यांनी आनंदची दोन ओला लफडी मजेदार केली आहेत. अमृताचा बाप झालेले मनीष आंजर्लेकर चेहर्‍यावर कायम काहीतरी भयानक दिसल्याचे भाव ठेवून वावरतात. त्यांचा बाप एक पूर्ण अर्कचित्र आहे. अक्षय विंचुरकर हे छोट्याशा भूमिकेत प्रभाव पाडतात. पण भन्नाट आहे ती गंगी- अमृता तोरडमल. तिची ऊर्जा, वावर, मुख्य म्हणजे नाचणे सारेच भन्नाट आहे.
एक टोटल परफॉर्मन्स देण्यात ही टीम यशस्वी झाली आहे.


– आभास आनंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -