घरमनोरंजनग्लोबल स्पाय सिरीज 'सिटाडेल'चा नवीन ट्रेलर प्रदर्शित

ग्लोबल स्पाय सिरीज ‘सिटाडेल’चा नवीन ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

आगामी हाय-स्टेक स्पाय-ड्रामा सिरीज ‘सिटाडेल’चा अ‍ॅक्शनने भरपूर असलेला एक नवा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च केला आहे. या ग्राउंडब्रेकिंग ग्लोबल सिरीजचा प्रीमियर 28 एप्रिल रोजी होणार असून, 26 मे पर्यंत दर शुक्रवारी नवीन भाग रिलीज होईल. तसेच, या मालिकेत रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनस यांच्यासह स्टॅनली टुकी आणि लेस्ली मॅनविल यांच्या व्यक्तिरेखा आहेत. अशातच, ‘सिटाडेल’ही सिरीज जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमधील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध होईल.

‘सिटाडेल’या नावाची ग्लोबल स्पाय एजन्सी आठ वर्षांपूर्वी नष्ट झाली आहे. ही एजन्सी लोकांचे संरक्षण करत असे, पण मॅन्टीकोरद्वारा हि एजन्सी नष्ट केली गेली होती. सिटाडेल नष्ट होताना मेसन केन (रिचर्ड मॅडन) आणि नादिया सिंग (प्रियांका चोप्रा जोनस) हे मुख्य एजंट आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले आणि आपली एक नवीन ओळख तयार करून जिवन जगू लागले. परंतु, एका रात्री बर्नार्ड ऑर्लिक (स्टॅनली टुकी) ज्याने अगोदर मेसनसोबत ‘सिटाडेल’मध्ये काम केले होते, तो माग काढतो आणि सर्वच अचानक बदलतं. मॅसनला मॅन्टीकोरला थांबवण्यासाठी नादिया सिंगची गरज असते आणि इथूनच एका नव्या मिशनला सुरुवात होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

- Advertisement -

अमेझॉन स्टुडिओज आणि रुसो ब्रदर्सच्या AGBOच्या सिटाडेलला AGBO साठी अँथनी रुसो, जो रुसो, माईक लारोका, अँजेला रुसो-ओटस्टोट आणि स्कॉट नेम्सद्वारा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युस केले गेले आहे, ज्यामध्ये डेव्हिड वील शोरनर आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत आहेत. तसेच, जोश ऍपलबाम, आंद्रे नेमेक, जेफ पिंकनर आणि स्कॉट रोझेनबर्ग यांनी मिडनाइट रेडिओसाठी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. न्यूटन थॉमस सिगेल आणि पॅट्रिक मोरन देखील एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून या सिरीज सोबत जुडले आहेत.


हेही वाचा :

‘सत्यप्रेम की कथा’मधील कार्तिक-कियाराच्या लग्नाचा सीन झाला लीक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -