घरमनोरंजनवर्षाअखेरीस नवीन बारा नाटके

वर्षाअखेरीस नवीन बारा नाटके

Subscribe

नाटक, चित्रपटांना दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचे सोहळे जानेवारी ते मार्च या दरम्यान होत असले तरी त्यांची प्राथमिक, अंतिम फेरी ही डिसेंबर महिन्यात होत असते. अशा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम कलाकृती म्हणून आपल्या नाटकाची वर्णी लागावी यासाठी बरेचसे निर्माते डिसेंबर महिन्यामध्ये नाटकाची निर्मिती करत असतात. यंदा या एकाच महिन्यात बारा नाटके रंगमंचावर येत आहेत. त्यानिमित्ताने मराठी रंगभूमीवर अनेक बदल घडून येणार आहेत.

पुरस्कार सोहळ्यांचे युग सुरू होण्यापूर्वी सर्वसाधारण गणेशोत्सवाआधी बर्‍याचशा नाटकांची निर्मिती होत होती. त्यालाही कारण तसेच होते. या उत्सवाच्या काळात दर्जेदार, प्रेक्षकांनी, समीक्षकांनी दखल घेतलेल्या नाटकांचे प्रयोग होत होते. या निमित्ताने अनेक दौर्‍यांचे आयोजन केले जात होते. आता उत्सवाच्या काळात वेळेचे बंधन, आवाजाचे नियंत्रण आल्याने कोणी आयोजक नाटकाचे प्रयोग लावायला मागत नाहीत. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस नाटकाची निर्मिती करणे हे वाढलेले आहे. यंदा यानिमित्ताने ‘सोयरे सकळ’,‘कोते हुवूप रेडे’,‘अ परफेक्ट मर्डर’,‘खळी’,‘तिला काही सांगायचंय’,‘द लास्ट डिनर’,‘पाहुणे आले पळापळा’,‘व्हाय सो गंभीर’, ‘भेटी लागी जीवा’‘ऑपरेशन जटायू’,‘गुमनाम है कोई’,‘दादा एक गुड न्यूज आहे’ यासारखी अनेक नाटके व्यावसायिक रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झालेली आहेत. या वर्षात आलेल्या नाटकांबरोबर ही नवी नाटकेही स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने व्यावसायिक नाट्यस्पर्धा घेतली जाते. ‘सांस्कृतिक कला दर्पण’ यांचासुद्धा स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्याचा कल असतो. रोख रक्कम शिवाय भव्यदिव्य व्यासपीठावर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. कलाकार, नाट्य निर्मात्यांसाठी हे आकर्षण आहे. शिवाय झी समुहाच्यावतीनेही पुरस्कार दिला जातो. त्याची प्रेक्षकांकडून दखल घेतली जाते. कारण प्रत्यक्ष सादरीकरण, नंतर वाहिनीवरून त्याचे प्रसारण असे प्रसिद्धीचे स्वरूप असल्यामुळे अशा स्पर्धेत आपल्याही नाटकाचा गौरव व्हावा हा प्रयत्न असतो. परिक्षकांचा कस लागेल असा प्रयत्न या नाटकांमध्ये असतो. संभाव्य यादीमध्ये दखल जरी घेतली तरी स्पर्धकांना काही वेगळे केल्याचे समाधान मिळते.

नव्या कलाकारांबरोबर अनेक सेलिब्रिटी कलाकार या नाटकाच्या निमित्ताने रंगमंचावर येत असतात. ‘सोयरे सकळ’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या, अविनाश नारकर ‘अ परफेक्ट मर्डर’ च्या निमित्ताने सतीश राजवाडे, पुष्कर श्रोत्री ‘खळी’ च्या निमित्ताने पल्लवी सुभाष, संदेश जाधव ,‘गुमनाम है कोई’ च्या निमित्ताने मधुरा वेलणकर, अंगद म्हसकर, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ च्या निमित्ताने उमेश कामत, ऋता दुर्गुळे ‘व्हाय सो गंभीर’ च्या निमित्ताने पल्लवी पाटील, आरोह वेलणकर, ‘ऑपरेशन जटायू’ च्या निमित्ताने अजय पूरकर, सुनिल जाधव रंगमंचावर प्रयोग करताना दिसणार आहेत. येणार्या नाटकांचा ओघ लक्षात घेता प्रेक्षकांसाठी ही एक आगळीवेगळी पर्वणीच असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -